जान्हवी थेलेसिमिया या गंभीर आजाराने आहे ग्रस्त
कोकरूड / वार्ताहर
कोकरूड जान्हवी संजय घोडे ही थेलेसिमिया आजाराशी झुंज देत आहे. जान्हवी जन्मजातच या गंभीर आजाराने ग्रासले आहे. तिच्यावर मुंबई येथील एस.आर.सि.सि चिलड्रन हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु आहेत. तिच्या या उपचारासाठी मोठा खर्च असून यासाठी समाजातील दानशूर लोकांच्या मदतीची गरज आहे. ही बाब मुंबईचे पोलीस जॉईंट कमिशनर विश्वास नांगरे पाटील यांना समजली. त्यांनी याबाबत अभिनेता अक्षय कुमारला सांगितले. यावेळी खिलाडी अक्षयने जान्हवीच्या उपचारासाठी 15 लाखाचा धनादेश दिला. तर यापुढेही मदत करू असे आश्वासनही दिले.
जान्हवी जन्मजात थेलेसिमिया या गंभीर आजाराने ग्रस्त आहे. यावरील उपचारासाठी तिचे वारंवार रक्त बदलावे लागत होते. ती कायमची चांगली होण्यासाठी तिच्यावर मज्जा रूजू रोपण करावे लागणार होते. त्यासाठी 45 लाख खर्च अपेक्षित होता. त्यापैकी 20 लाख जमा झाले होते. अजूनही पैशाची गरज आहे. ही बाब मुंबईचे पोलीस जॉईंट कमिशनर विश्वास नांगरे पाटील यांना समजली. त्यांनी फिल्म स्टार अक्षय कुमारला सांगितले असता खिलाडी अक्षय जान्हवीच्या मदतीसाठी धावून आला. मुंबई येथील एस आर सि सि चिल्डन हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. यापूर्वी मदतीसाठी अनेक वृत्त वाहिनीवर बातमी दाखवण्यात आली होती.



