Tarun Bharat

सांगली जिल्हय़ाची रूग्णसंख्या दहा हजार पार

प्रतिनिधी / सांगली

शुक्रवारी जिल्हय़ात 481 रूग्ण वाढले, त्यामुळे जिल्हय़ातील एकूण रूग्णसंख्येने दहा हजाराचा आकडा पार केला आहे. तर 245 जण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचार सुरू असताना 21 जणांचे मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये जिल्हय़ातील 18 जणांचा आणि परजिल्हय़ातील तिघांचा समावेश आहे. एकूण जिल्हय़ात 428 जणांचा आजअखेर कोरोनाने बळी गेला आहे.

महापालिका क्षेत्रात 235 रूग्ण वाढले

महापालिका क्षेत्रात गुरूवारी पुन्हा एकदा तब्बल 235 नवीन रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये सांगली शहरात 188 तर मिरज शहरात 47 रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात मोठयाप्रमाणात रूग्ण वाढतच चालले आहेत. या वाढत्या रूग्णसंख्येला आळा घालण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. पण ते प्रयत्न होत नाहीत. मनपाकडून रॅपीड ऍण्टीजन टेस्टही मोठय़ाप्रमाणात सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ही रूग्णसंख्या वाढतच चालली आहे. महापालिकेकडून वाढत्या रूग्णसंख्येला रोखण्यासाठी अनेक ठोस उपाययोजना केल्या आहेत. तसेच महापालिकेने अदिसागर मंगल कार्यालय येथे 125 बेडचे नवीन रूग्णालय सुरू केले आहे. हे रूग्णालय आता फुल्ल झाले आहे. तसेच याठिकाणी आता ऑक्जिन आणि व्हेटिंलेटरचीही सुविधा देण्यात आली आहे. मिरजेत नवीन 47 रूग्ण वाढलेले आहेत. सांगली मिरज महापालिका क्षेत्रात  आजअखेर एकूण रूग्णसंख्या पाच हजार 954 झाली आहे.

ग्रामीण भागात 246 रूग्ण वाढले

शुक्रवारी ग्रामीण भागातही मोठय़ासंख्येने रूग्ण वाढले आहेत. नवीन 246 रूग्ण  आढळून आले आहेत. त्यामध्ये आटपाडी तालुक्यात 18, जत तालुक्यात चार, कडेगाव तालुक्यात एकही  रूग्ण आढळून आला नाही. कवठेमहांकाळ तालुक्यात तब्बल 14, खानापूर तालुक्यात 16, मिरज तालुक्यात 31 रूग्ण वाढले आहेत. पलूस तालुक्यात 21, शिराळा तालुक्यात 13, तासगाव तालुक्यात तब्बल 54 आणि वाळवा तालुक्यात तर 75 रूग्ण वाढले आहेत.  असे एकूण ग्रामीण भागात 246 रूग्ण वाढले आहेत.

जिल्हय़ातील  18 जणांचा मृत्यू

जिल्हय़ातील 18 जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. यामध्ये सांगली शहरातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील 72 आणि 52 वर्षीय महिलेचा कोरोना रूग्णालयात  तर 63 आणि 60 वर्षीय व्यक्तीचा सिनर्जी हॉस्पिटल येथे  उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर 74 वर्षीय महिलेचा घाटगे हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. मिरजेतील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 60 वर्षीय व्यक्तीचा भारती हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. तर 79 वर्षीय महिलेचा कोरोना रूग्णालय येथे मृत्यू झाला.   तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथील 60 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालयात येथे मृत्यू झाला. जत येथील 45 वर्षीय महिलेचा तर गोटवाडी येथील 63 वर्षीय व्यक्तीचा कोरोना हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. वाळवा तालुक्यातील नवखेड येथील 81 वर्षीय व्यक्तीचा एचडीएच इस्लामपूर येथे. रेठरेधरण येथील 37 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालय येथे मृत्यू झाला. बागणी येथील 73 वर्षीय महिलेचा तसेच नागठाणे येथील 50 वर्षीय व्यक्तीचा भारती हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. येलूर येथील 54 वर्षीय व्यक्तीचा वॉनलेस हॉस्पिटल येथे. तर तासगांव तालुक्यातील मणेराजुरी येथील 48 व्यक्तीचा श्वास हॉस्पिटल येथे व इस्लामपूर येथील 54 वर्षीय व्यक्तीचा विवेकानंद हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. या 18 व्यक्तीच्या मृत्यूमुळे जिल्हय़ातील एकूण बळीची संख्या 428 झाली आहे.

परजिल्हय़ातील तिघांचा मृत्यू

शुक्रवारी परजिल्हय़ातील तिघांचा मृत्यू झाला आहे त्यामध्ये कोल्हापूर जिल्हय़ातील जयसिंगपूर येथील 73 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालयात येथे तर कराड येथील 72 वर्षीय व्यक्तीचा एसडीएच इस्लामपूर येथे मृत्यू झाला. हेरवाड येथील 65 वर्षीय व्यक्तीचा वॉनलेस हॉस्पिटल येथे मृत्यू झाला.   परजिल्हय़ातील 99 जणांचे आजअखेर मृत्यू झाले आहेत.

245 जण कोरोनामुक्त

शुक्रवारी जिल्हय़ात उपचार सुरू असणारे 245 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रूग्ण बरे होण्याची संख्या  वाढत चालली आहे. जिल्हय़ात आजअखेर बरे झालेल्या रूग्णांची संख्या सहा हजार 293 झाली आहे. त्यामुळे रूग्ण बरे होण्याची टक्केवारी वाढतच चालली आहे.

कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती

एकूण रूग्ण    10422

बरे झालेले     6293

उपचारात      3701

मयत          428

Related Stories

संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या पत्रकार गिरीश कुबेरवर गुन्हा दाखल करा

Archana Banage

धक्कादायक ! तीन दिवस भावाच्या मृतदेहासोबत राहिली मनोरुग्ण बहिण

Archana Banage

रांगोळीकार अदमअल्ली मुजावरांनी चित्रे विकून दिला कोरोना निधी

Archana Banage

सांगली : आँगस्ट क्रांतीदिनी बलवडीच्या क्रांतिस्मृतीवनात बालकांकडून अभिवादन

Archana Banage

इस्लामपूरचा डॉ.योगेश वाठारकरला पाच दिवसांची पोलीस कोठडी

Archana Banage

लान्स नायक भीमराव माने यांचे निधन

Abhijeet Khandekar