Tarun Bharat

सांगली जिल्हय़ात 35 जणांचा मृत्यू ,नवे 979 रूग्ण

प्रतिनिधी / सांगली

बुधवारी जिल्हय़ात नवीन 979 रूग्ण वाढले आहेत. तर 383 जण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचार सुरू असताना 35 जणांचे मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये जिल्हय़ातील 32 आणि परजिल्हय़ातील तिघांचा समावेश आहे. एकूण जिल्हय़ात 735 जणांचा आजअखेर कोरोनाने बळी गेला आहे. तर आजअखेर 10 हजार 300 रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

महापालिका क्षेत्रात 295 रूग्ण वाढले

महापालिका क्षेत्रात बुधवारी नवीन 295 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये सांगली शहरात 211 तर मिरज शहरात 84 रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात आजअखेर 15 हजार रूग्णांची ऍण्टीजन टेस्ट करण्यात आली आहे. यामध्ये जवळपास 35 ते 40 टक्के लोक बाधित आढळून आले आहेत. सांगली  महापालिका क्षेत्रात आजअखेर एकूण रूग्णसंख्या नऊ हजार 173 झाली आहे.

ग्रामीण भागात बुधवारी हाहाकार

ग्रामीण भागात बुधवारी कोरोनाने हाहाकार केला आहे. बुधवारी एकाच दिवसांत 684 नवे रूग्ण आढळून आले आहेत. ग्रामीण भागात मोठय़ा संख्येने रॅपीड ऍण्टीजन टेस्ट सुरू केल्याने ही रूग्णसंख्या वाढत चालली आहे. बुधवारी आढळून आलेल्या रूग्णामध्ये आटपाडी तालुक्यात 28, जत तालुक्यात 50, कडेगाव तालुक्यात 75 नवीन रूग्ण वाढले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात 55, खानापूर तालुक्यात 73, मिरज तालुक्यात 115 रूग्ण वाढले आहेत. पलूस तालुक्यात 75, शिराळा तालुक्यात 32, तासगाव तालुक्यात 67 आणि वाळवा तालुक्यात 114 रूग्ण वाढले आहेत.

जिल्हय़ातील 32 जणांचा मृत्यू

जिल्हय़ातील 32 जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. यामध्ये  सांगली शहरातील चौघांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 55, 62, 63 आणि 75 वर्षीय व्यक्ती यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मिरज शहरात चौघांचे मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये 47, 62 आणि 67 वर्षीय व्यक्तीचा आणि 26 वर्षीय  महिलेचा मृत्यू झाला.  तासगाव येथील दोघांचा मृत्यू झाला. 64 वर्षीय महिला आणि 87 वर्षीय व्यक्ती यांचा ग्रामीण रूग्णालय येथे मृत्यू झाला. इस्लामपूर येथील दोघांचा मृत्यू झाला. 85 वर्षीय महिलेचा एसडीएच आणि 72 वर्षीय महिलेचा  महिलेचा आधार हॉस्पिटल येथे  मृत्यू झाला. विटा येथील दोघांचा मृत्यू झाला. 62 वर्षीय महिलेचा ओमश्री हॉस्पिटल येथे तर 70 वर्षीय व्यक्तीचा ग्रामीण रूग्णालय येथे मृत्यू झाला. माडग्याळ येथील 50 वर्षीय व्यक्ती, कार्वे येथील 55 वर्षीय व्यक्ती, शिर्वी येथील 64 वर्षीय व्यक्ती, कदमवाडी येथील 68 वर्षीय व्यक्ती यांचा ग्रामीण रूग्णालय येथे मृत्यू झाला.

 अमरापूर येथील 70 वर्षीय व्यक्ती, म्हैसाळ येथील 65 वर्षीय व्यक्ती पेठ येथील 61 वर्षीय व्यक्ती यांचा मिरजेच्या कोरोना रूग्णालयात मृत्यू झाला. जत येथील 51 वर्षीय व्यक्ती आणि कुमठे येथील 50 वर्षीय महिला यांचा वॉनलेस हॉस्पिटल येथे मृत्यू झाला ढवळी येथील 72 वर्षीय महिलेचा घाटगे  हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. कुमठे येथील 46 वर्षीय व्यक्तीचा सांगली सिव्हील येथे मृत्यू झाला. बिसूर येथील 61 वर्षीय महिलेचा ऍपेक्स मिरज येथे. नरवाड  येथील 60 वर्षीय व्यक्तीचा आणि बोरगाव येथील 48 वर्षीय व्यक्तीचा भारती हॉस्पिटल येथे मृत्यू झाला.  रेठरेहरणाक्ष येथील 75 वर्षीय व्यक्तीचा सश्रुत हॉस्पिटल येथे. वायफळे येथील 75 वर्षीय व्यक्तीचा श्री सेवा हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. खानापूर येथील 65 वर्षीय व्यक्तीचा, आणि कोकळे येथील 45 वर्षीय व्यक्तीचा लाईफ केअर  हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. या 32 व्यक्तीच्या मृत्यूमुळे जिल्हय़ातील एकूण बळीची संख्या 735 झाली आहे.

परजिल्हय़ातील तिघांचा मृत्यू

 परजिल्हय़ातील उपचार सुरू असणाऱया तिघांचा मृत्यू झाला आहे.  कोल्हापूर जिल्हय़ातील इचलकरंजी येथील 79 वर्षीय महिलेचा श्वास हॉस्पिटल येथे. कराड तालुक्यातील शेर्वे येथील 85 वर्षीय महिलेचा आधार हॉस्पिटल येथे तर  बेलदारी येथील 54 वर्षीय व्यक्तीचा मिरज चेस्ट हॉस्पिटल येथे  मृत्यू झाला आहे. आजअखेर परजिल्हय़ातील 129 जणांचे कोरोनाने बळी गेले आहेत.

10 हजार 300 जणांची कोरोनावर यशस्वी मात

जिल्हय़ात कोरोना रूग्णांची संख्या जरी वाढत असली तरीसुध्दा कोरोना रूग्ण बरे होण्याची संख्याही आता चांगलीच वाढत चालली आहे. बुधवारी 383 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आजअखेर जिल्हय़ातील 10 हजार 300 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती

एकूण रूग्ण    19260

बरे झालेले     10300

उपचारात      8225

मयत          735

Related Stories

राष्ट्रवादीचे पदाधिकारी पाटोळेंचा पूर्ववैमनस्यातून खून; पाच जण अटकेत

Archana Banage

म्हैसाळ परीसरात गव्याचा धुमाकूळ

Archana Banage

आंतरजातीय विवाहितांवर सामाजिक बहिष्कार टाकणाऱ्यांवर गुन्हा दाखल

Abhijeet Khandekar

कडेगाव वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयात मनमानी व अनागोंदी कारभार

Archana Banage

जनता दलाची सांगलीत निदर्शने

Archana Banage

सांगलीत आढळले दुर्मिळ फुलपाखरू

Archana Banage
error: Content is protected !!