सांगली / प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यामध्ये चाळीस हजार पेक्षा जास्त बांधकाम कामगार असून त्यांचे सर्व काम मागील एक वर्षभर पासून पूर्णपणे थांबलेले आहे. सांगली जिल्ह्यामध्ये दहा हजार पेक्षा जास्त बांधकाम कामगारांच्या लाभाच्या अर्ज प्रलंबित असून त्याची प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी व कामगारांना सत्वर लाभ द्यावेत या मागणीसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बोलताना अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी सांगितले की सांगलीच्या सहायक कामगार आयुक्तांना तातडीने बोलावून याबाबतची प्रक्रिया सुरू करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. त्यावेळी शंकर पुजारी विजय बचाटे यांची भाषणे झाली.
आंदोलनास भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने नंदकुमार हातेकर, किसान सभेच्या वतीने वैभव पवार, जयसिंगपूर येथील बांधकाम कामगारांचे नेते रघुनाथ देशिंगे व सातारा जिल्ह्यातील धनराज कांबळे यांनी पाठिंबा दिला.


previous post