वाळवा, मिरज, पलूस कडेगाववर मेहरनजर
आमदार नाराज मात्र गप्प का ?
प्रतिनिधी / आळसंद
सांगली जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीचे वाटप असमान पद्धतीने झाले आहे. पालकमंत्र्यांच्या वाळवा आणि राज्यमंत्र्यांच्या पलूस-कडेगावला जादा निधी मिळावा असून उर्वरित जिल्ह्यात जेमतेम निधी देऊन बोळवण करण्यात आल्याने आमदार नाराज झाले आहेत. मात्र त्यांची शांतता जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
जिल्ह्यात ग्रामीण भागातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि जाणकार मंडळांमध्ये केवळ एकच चर्चा आहे. ती म्हणजे जिल्हा नियोजन विकास मंडळाच्या निधीचा करेक्ट कार्यक्रम झाल्याची. मानव विकास निर्देशांकानुसार आणि भौगोलिक रचनेनुसार निधी मंजूर करावा असा शासनाचा आदेश असतानासुद्धा याकडे कानाडोळा करण्यात आल्याची या मंडळींची तक्रार आहे. आपली नाराजी त्यांनी नेत्यांच्या कानावर घातली आहे. मात्र आमदार आणि तालुक्यातील इतर नेते जिल्ह्यातील मंत्र्यांच्या विरोधात अद्याप तरी शांत आहेत. त्यांनी व्यक्तीच्या याबाबत शासकीय अधिकारी आणि मंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली असली तरी त्याबाबतची चर्चा मात्र बाहेर होणार नाही याची दक्षता घेतली आहे. त्यामुळे असमान वाटपाचा निधी तसाच खर्च होणार का ? आमदार हा अन्याय सहन करणार का अशी शंका कार्यकर्ते व्यक्त करू लागले आहेत.
शिराळा 2 कोटी 55 लाख असा निधी वाटप झाला आहे. दोन मंत्र्यांच्या मतदार संघात यातील २२ कोटी निधी खर्च होणार आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आणि एकूण जिल्ह्याच्या एक तृतीयांश भूभाग असलेल्या जत तालुक्याला तोकडा निधी मिळाला आहे. हीच अवस्था खानापूर आणि आटपाडी तालुक्याचीही झाली आहे. अविकसित तालुक्यांना जिल्हा नियोजन मंडळातून जास्तीत जास्त निधी मिळाला पाहिजे. मात्र नेमक्या त्याच तालुक्यांवर अन्याय होत असल्याची कार्यकर्त्यांची भावना निर्माण झाली आहे. नेत्यांनी याबाबत स्पष्ट शब्दात बोलावे प्रसंगी वरिष्ठांच्या कानावर तक्रार घालून निधीचे असमान वाटप रोखावे अशी त्यांची मागणी आहे. ग्रामीण आणि शहरी रस्ते विकासाच्या कामात की वाळवा तालुक्याला जवळपास 12 कोटींचा निधी मिळाला आहे. मिरज तालुक्याला ही दहा कोटीचा निधी असून यातील जादा निधी हा मिरज पश्चिम भागात खर्चे पडण्याची शक्यता आहे. जत तालुक्यात रस्ते लांबी ही जास्त असतानाही तेथे केवळ पावणेसहा कोटीचा निधी देण्यात आला आहे. तर पलूस-कडेगाव तालुक्याला सुमारे नऊ कोटी रुपये, तासगाव कवठेमंकाळ तालुक्यांना पावणे सहा कोटी रुपये सर खानापूर आटपाडी ला सात कोटींचा निधी मिळाला आहे. डोंगरी शिराळा तालुक्याला केवळ अडीच कोटी रुपये मिळाले आहेत.
जिल्ह्यातील मंत्र्यांच्या मतदारसंघाला जादा निधी मिळाला याबद्दल कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही. मात्र मंत्री राज्य मंत्रिमंडळात बसून विविध प्रकारचा निधी आपल्या मतदार संघात आणू शकतात. त्यांनी पुन्हा जिल्हा नियोजन मंडळ आतील निधी जर आपल्या मतदारसंघातच वापरली तर उर्वरित जिल्ह्याचा विकास कधी होणार ? दहा वर्षापूर्वी जिल्ह्यातील मंत्र्यांच्या तालुक्यांमध्ये उपजिल्हा रुग्णालय आणि रस्त्यांपासून सर्व बाबतीत खर्च झाला आहे.
वडवणी जिल्हा या निधीबाबतीत नेहमीच उपेक्षित राहिला असताना आताही तसेच होणार का ? याबाबत अन्याय झालेल्या तालुक्यांमधील कार्यकर्ते नाराजी व्यक्त करत आहेत. मंत्र्यांनी मनाचे मोठेपण दाखवून उर्वरित तालुक्यात जास्तीत जास्त निधी खर्च करण्यासाठी नियोजन मंडळाच्या निधीच्या वाटपाचे धोरण बदलून शासनाने सुचवल्याप्रमाणे निधीचे वाटप करावे अशी मागणी होत आहे.
हाती आलेल्या आकडेवारीनुसार वाळवा 12 कोटी 8 लाख,
मिरज 9 कोटी 64 लाख (या तालुक्यातील कवठेपिरान डिग्रज वगैरे भाग वाळवा मतदारसंघात),
जत 5 कोटी 89 लाख,
तासगाव 3 कोटी 52 लाख,
कवठे महांकाळ 3 कोटी 6 लाख,
कडेगाव 4 कोटी 96 लाख,
पलूस 4 कोटी 76 लाख,
खानापूर 2 कोटी 39 लाख,
आटपाडी 4 कोटी 98 लाख,