Tarun Bharat

सांगली जिल्हा नियोजन समितीची शुक्रवारी ऑनलाईन पध्दतीने बैठक-जिल्हाधिकारी

सांगली / प्रतिनिधी

जिल्हा नियोजन समितीची बैठक जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 14 रोजी दुपारी 12.30 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती. तथापि कोविड-19 विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा नियोजन समितीची बैठक सदर वेळेत ऑनलाईन पध्दतीने घेण्याचे निर्देश पालकमंत्री पाटील यांनी दिले आहेत. त्यानुसार सदरची बैठक ऑनलाईन पध्दतीने होणार असून ‍जिल्हा नियोजन कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या लिंकवर संबंधितांनी ऑनलाईनव्दारे बैठकीत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

बैठकीस ऑनलाईव्दारे सहभागी होण्यासाठी काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी यासिन पटेल (मो. नं. 9657340699) तसेच संचित पवार (मो. नं. 9021026898) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी चौधरी यांनी केले आहे.

Related Stories

सांगली: गणरायाचे उत्साहात आगमन

Archana Banage

नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा : मुख्यमंत्री

Archana Banage

सांगली : मिरजेतील व्यापाऱ्यांचा लॉकडाऊनला विरोध

Archana Banage

सरकारच्या आश्वासनानंतर लाल वादळ शमले!

datta jadhav

मुंबई : धारावीत 20 नवे कोरोना रुग्ण, दोन जणांचा मृत्यू

Tousif Mujawar

काँग्रेसला धक्का : महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांचा भाजपमध्ये प्रवेश

Archana Banage