Tarun Bharat

सांगली जिल्हा बँक : विकास महाआघाडी विरुद्ध भाजपा चुरशीची लढत

प्रतिनिधी / सांगली

अख्ख्या सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज माघारीनंतर चित्र स्पष्ट झाले असून विकास महा आघाडी विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशी जोरदार लढत होणार आहे. निवडणुकीत शिराळा येथील राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक, खानापूर आटपाडीचे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, आणि कुंडलचे काँग्रेस नेते महेंद्र आप्पा लाड यांची संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली. तर खासदार संजय काका पाटील यांच्यासह विद्यमान 9 संचालक रिंगणाबाहेर असल्याचे स्पष्ट झाले.

21 जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष दिलीप पाटील, उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, आमदार मोहनराव कदम, आमदार विक्रमसिंह सावंत, माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, काँग्रेस नेत्या जयश्री पाटील, वसंत दादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, आष्टा येथील राष्ट्रवादीचे नेते वैभव शिंदे, चिमण डांगे, वाळवा तालुक्यातून सी. बी. पाटील राहुल महाडिक, महांकाली साखर कारखाना अध्यक्षा अनिता सगरे, शिराळा भाजपाचे नेते सत्यजित देशमुख आदी दिग्गज उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

जत मधून आमदार विक्रम सावंत यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे प्रकाश जमदाडे यांनी बंडखोरी केली आहे. तर खासदार संजय काका पाटील यांच्यासह विद्यमान संचालक मनोज शिंदे, सिकंदर जमादार, बी.के. पाटील, झुंजार राव शिंदे, गणपती सगरे, चंद्रकांत हाक्के, उदयसिंह देशमुख, श्रद्धा चरापले, कमल पाटील हे निवडणुकीच्या रिंगणाबाहेर असतील. 21 जागांसाठी 21 नोव्हेंबरला मतदान व 23 रोजी मतमोजणी होणार आहे. 2219 इतके मतदार आहेत.

Related Stories

जागतिक बुद्धिबळदिनानिमित्त सांगलीमधून विविध ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन

Archana Banage

आंतरजातीय विवाहितांवर सामाजिक बहिष्कार टाकणाऱ्यांवर गुन्हा दाखल

Abhijeet Khandekar

हिंमत असेल तर पालकमंत्र्यांशिवाय निवडणूक लढवावी

Archana Banage

सांगलीच्या श्रेयस पुरोहितची इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रमी नोंद

Archana Banage

सांगली : आमणापूर येथे विजेच्या धक्क्याने बालकाचा मृत्यू

Archana Banage

बोगस शिधापत्रिका प्रकरणी माजी नगरसेवकाला अटक

Archana Banage