Tarun Bharat

“सांगली जिल्ह्यातील मराठा मुला-मुलींच्या वसतीगृहाचा प्रश्न शासन सोडवणार”

Advertisements

मंत्री अशोक चव्हाण यांचे शिष्टमंडळाला आश्वासन

प्रतिनिधी / सांगली :

सांगली जिल्ह्यातील मराठा मुला-मुलींच्या वसतिगृहाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे तसेच प्रवेश आणि इतर बाबतीत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्ह्यातील शिष्टमंडळाला दिले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हेही उपस्थित होते.

शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगड़े पाटील, जिल्हाप्रमुख संजय विभूते, आनंदराव पवार, मराठा क्रांती मोर्चा व मराठा सेवक समिती महाराष्ट्राच्या वतीने प्रशांत भोसले या बैठकीस उपस्तिथ होते. सदर बैठकीसाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर यांनी विशेष प्रयत्न केले होते.

मराठा समाजाच्या विविध प्रश्नावर सांगली जिल्हा दौऱ्यावर असताना मंत्री उदय सामंत यांनी बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार शुक्रवारी मुंबई येथे मंत्री अशोक चव्हाण यांच्या घरी मराठा समाजाच्या विविध प्रश्नावर भेट घेऊन शिष्टमंडळाने चर्चा केली.
या भेटी दरम्यान चव्हाण यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याबरोबर मराठा समाजाला ओबीसी धर्तीवर शैक्षिणक सवलती, सांगली जिल्ह्यातील मुला-मुलींचा वसतीगृह प्रश्न सोडवण्या बरोबर समांतर आरक्षण असेल अथवा 2014 व 2018 कायद्यानुसार दिलेल्या मुलांच्या नियुक्तया असतील याबाबत सरकार म्हणून आपण मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका घेऊ. कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी करण्यात आली.

सारथी व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, तरुणांवरील गुन्हे मागे घेणे यासह सर्व मागण्याबाबत सदैव मराठा समाजासोबत असल्याचेही मंत्री चव्हाण आणि सामंत यांनी सांगितले. याशिवाय प्रवेशाबाबत आवश्यक असलेले दाखले मिळावेत म्हणून व विद्यार्थी वर्गाचे होणारे हाल टाळण्यासाठी लवकरच अधिक सेतु कार्यालये सुरु करण्याचे निर्देश देण्यात येतील असे आश्वासनही त्यांनी दिले.

Related Stories

वाळवा तालुक्यात एका दिवसात १८ जण पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

सांगली : मिरजेत साकारली जिल्हाधिकारी कार्यालयाची हुबेहुब प्रतिकृती

Abhijeet Shinde

कडेगाव : मुंबईहून आलेल्या व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

शिराळा पोलिस स्टेशनने पटकावला देशात सातवा क्रमांक

Sumit Tambekar

सांगली : दिव्यांगांना मदतीचा हात ही काळाची गरज

Abhijeet Shinde

सांगली : ‘तो’ चाकू हल्ला मोबाईल चॅटींगच्या वादातूनच

Abhijeet Shinde
error: Content is protected !!