Tarun Bharat

सांगली : जिल्ह्यातील वारणा धरणात 31.74 टी.एम.सी. पाणीसाठा तर शिराळा तालुक्यात 12.2 मि. मी. पावसाची नोंद

Advertisements

सांगली / प्रतिनिधी

जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 31.74 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.


आपल्या शेजारील सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये 91.64 टी.एम.सी इतका पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता 105.25 टी.एम.सी, धोम धरणात 12.46 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 13.50 टी.एम.सी, कन्हेर धरणात 9.00 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 10.10 टी.एम.सी., उरमोडी धरणात 9.44 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 9.97 टी.एम.सी, तारळी धरणात 5.35 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 5.85 टी.एम.सी. आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात 23.62 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 25.40 व राधानगरी धरणात 8.23 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 8.36 टी.एम.सी.आहे. अलमट्टी धरणात 97.55 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 123 टी.एम.सी. असल्याचे जलसंपदा विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे कोयना धरणातून 11431 क्युसेक्स, धोम 203, कण्हेर धरणातून 2688 क्युसेक्स, वारणा धरणातून 2995 क्युसेक्स, दूधगंगा धरणातून 1800 क्युसेक्स, राधानगरी धरणातून 1400 क्युसेक्स, तुळशी धरणातून 504 क्युसेक्स, कासारी धरणातून 250 क्युसेक्स, धोम बलकवडी धरणातून 2205 क्युसेक्स, उरमोडी धरणातून 1710 क्युसेक्स, तारळी धरणातून 834 क्युसेक्स, अलमट्टी धरणातून 251922 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 16.5 (45), आयर्विन पूल सांगली 36.6 (40) व अंकली पूल हरिपूर 42.4 (45.11)

जिल्ह्यात शिराळा तालुक्यात 12.2 मि. मी. पावसाची नोंद

सांगली, दि. 20 जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 1.96 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्यात सर्वाधिक 12.2 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.


जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 0.9 (402.8), तासगाव 0.0 (359.6), कवठेमहांकाळ 0.5 (406.6), वाळवा-इस्लामपूर 2.3 (469.2), शिराळा 12.2 (1109.0), कडेगाव 0.7 (393.8), पलूस 0.8 (322.2), खानापूर-विटा 0.2 (467.0), आटपाडी 0.0 (286.7), जत 0.3 (232.8).

Related Stories

कोरोना तपासणी विनाच शिक्षक झाला हजर, नंतर निघाला पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

सांगली : चंद्रकांतदादा म्हणजे आयत्या बिळावर नागोबा

Abhijeet Shinde

वारणा धरण ५० टक्के भरले, धरणात १८.८३ टीएमसी पाणीसाठा

Abhijeet Shinde

नांद्रे येथे महारक्तदान शिबीराचे आयोजन

Abhijeet Shinde

सांगली : लेखक-कवी,गिर्यारोहक आपल्या भेटीला, मराठी अध्यापक संघाचा उपक्रम

Abhijeet Shinde

घरात पाणी गेलेल्यांना दोन दिवसात दहा हजार मिळणार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!