प्रतिनिधी / सांगली
सोमवारपासून जिल्ह्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन तीव्र झाले आहे. या पार्श्वभूमीवर महामंडळ कडून सांगली जिल्ह्यातील सुमारे ५० ते ६० एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन होण्याची शक्यता असल्याची माहिती विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी दिली. निलंबनाच्या शक्यतेमुळे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात गेल्या 13 दिवसापासून एसटी महामंडळ राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. यात आटपाडी आगाराने पुढाकार घेतला होता. त्याची झळ विटा, जत पर्यंत पोहोचली होती. त्यानंतर रविवारी इस्लामपूर आणि शिराळा आगार सम्पात सामील झाले. तर सोमवारपासून जिल्ह्यातील सर्वच आगार सहभागी झाले.
ऐन सणात संप करून प्रवाशांची गैरसोय करू नये, यासाठी महामंडळाने एसटी कर्मचाऱ्यांना नोटिसा दिल्या होत्या. तरीही हा सुरूच होता. त्यामूळे आता कारवाई म्हणून महामंडळाकडून सांगली विभागातील सुमारे 50 ते 60 कर्मचाऱ्यांचे निलंबन होण्याची शक्यता आहे.


next post