Tarun Bharat

सांगली जिल्ह्यात कोरोनाने सहा बळी, 294 नवे रूग्ण

Advertisements

प्रतिनिधी / सांगली

रविवारी जिल्हय़ात कोरोनाने हाहाकार उडविला आहे. विक्रमी 294 रूग्ण वाढले आहेत. तर 90 जण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण रूग्णसंख्य़ा 3093 झाली आहे. तर सहा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्हय़ात बळीची संख्या 96 वर पोहचली आहे. सांगली शहरात 185 रूग्ण वाढले आहेत.

महापालिका क्षेत्रात कोरोनाचा कहर सुरूच

सांगली महापालिका क्षेत्रात कोरोनाचा कहर सुरू झाला आहे. रविवारी सांगली शहरात 185 रूग्ण वाढले आहेत. मिरज शहरात एकाच दिवसांत 80 रूग्ण आढळून आले आहेत. तर कुपवाड मध्ये नवीन तीन रूग्ण आढळून आले आहेत. महापालिका क्षेत्रात रॅपीड ऍण्टीजन टेस्टमध्ये निव्वळ 48 रूग्ण आढळून आले आहेत. उर्वरित सर्व रूग्ण हे स्वॅब घेतल्यानंतर त्यामध्ये पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे सांगली शहरातील वाढती रूग्णसंख्य़ा चिंताजनक बनत चालली आहे.

ग्रामीण भागात कोरोनाचा कहर कमी

सांगली महापालिका क्षेत्रात मोठय़ाप्रमाणात रूग्ण जरी वाढले असले तरीसुध्दा ग्रामीण भागात मात्र रूग्णसंख्या आटोक्यात येवू लागली आहे. दहा तालुक्यात फक्त 26 नवीन रूग्ण वाढले आहेत. त्यामदये आटपाडी तालुक्यात एक, जत तालुक्यात चार नवे रूग्ण आढळून आले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात दोन रूग्ण आढळले आहेत. खानापूर तालुक्यात दोन रूग्ण वाढले आहेत. मिरज तालुक्यात मात्र सात रूग्ण वाढले आहेत. पलूस तालुक्यात दोन रूग्ण वाढले आहेत. शिराळा तालुक्यात दोन, तासगाव तालुक्यात दोन आणि वाळवा तालुक्यात चार रूग्ण वाढले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात फक्त 26 नवे रूग्ण आढळून आले आहेत.

उपचारादरम्यान सहा जणांचा मृत्यू

सांगली शहरातील 47 वर्षीय व्यक्तीवर मिरजेच्या कोरोना रूग्णालयात उपचार सुरू होते. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच सांगली शहरातील 72 वर्षीय व्यक्तीचा मेहता हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पलूस येथील 65 वर्षीय महिलेचा कोरोना रूग्णालयात उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. आष्टा येथील 65 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर मांगरूळ येथील 64 वर्षीय व्यक्तीचा सेवासदन हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रविवारी सहा जणांचे मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या 96 झाली आहे.

कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती
एकूण रूग्ण 3093
बरे झालेले 1356
उपचारात 1641
मयत 96

Related Stories

गरिबांना मोफत लशीची केंद्राकडे मागणी : राजेश टोपे

Tousif Mujawar

कोरोना : महाराष्ट्रात 24,645 नवे रुग्ण; 58 मृत्यू

Tousif Mujawar

सातारा : कारवाई करण्यासाठी पालिकेची आता पाच पथके सक्रिय

Archana Banage

श्रीरामाच्या नावाने देशात आतंकवाद-तुषार गांधी

Kalyani Amanagi

सिध्दवाडीच्या महापुरात माकडासाठी माणुसकीची धडपड

Archana Banage

महाराष्ट्र : ‘या’ तारखेपासून सुरू होणार पाचवी ते आठवीचे वर्ग

Tousif Mujawar
error: Content is protected !!