Tarun Bharat

सांगली जिल्ह्यात कोरोनाचे ८११ नवे रुग्ण, ३२ जणांचा मृत्यू

Advertisements

आज 957 जण कोरोनामुक्त

प्रतिनिधी / सांगली

रविवारी जिल्हÎात नवीन 811 रूग्ण वाढले. तर दिवसभरात 957 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचार सुरू असताना 35 जणांचे मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये जिल्हÎातील 32 आणि परजिल्हÎातील तिघांचा समावेश आहे. एकूण जिल्हÎात 1102 जणांचा आजअखेर कोरोनाने बळी गेला आहे.

महापालिका क्षेत्रात 307 रूग्ण वाढले

महापालिका क्षेत्रात रविवारी 307 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये सांगली शहरात 240 तर मिरज शहरात 67 रूग्ण वाढले आहेत. गेल्या चार दिवसांपासुन सांगली शहरात मोठयासंख्येने रूग्ण वाढत होते.  महापालिका क्षेत्रात आता घर टू घर सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. तसेच ज्यांना कोरोनाचा त्रास होत आहे. त्यांची तपासणीही सुरू करण्यात आल्याने ही रूग्णसंख्या वाढतच चालली आहे. महापालिका क्षेत्रात आजअखेर एकूण रूग्णसंख्या 12 हजार 207 झाली आहे.

ग्रामीण भागात 504 रूग्ण वाढले

रविवारी ग्रामीण भागात 504 नवे रूग्ण आढळून आले आहेत. ग्रामीण भागात मोठÎा संख्येने रॅपीड ऍण्टीजन टेस्ट सुरू केल्याने ही रूग्णसंख्या वाढत चालली आहे. तालुकानिहाय वाढलेली रूग्णसंख्या अशी, आटपाडी तालुक्यात 47, जत तालुक्यात 29, कडेगाव तालुक्यात 38 नवीन रूग्ण वाढले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात 47, खानापूर तालुक्यात 32, मिरज तालुक्यात 76 रूग्ण वाढले आहेत. पलूस तालुक्यात 38, शिराळा तालुक्यात 26, तासगाव तालुक्यात 59 आणि वाळवा तालुक्यात 112 रूग्ण वाढले आहेत.

जिल्हÎातील 32 जणांचा मृत्यू

जिल्हÎातील 32 जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. यामध्ये  सांगली शहरातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. मिरज शहरातील दोघांचा मृत्यू झाला आहे.  जत तालुक्यातील दोघांचा, कडेगाव तालुक्यातील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील एकाचा, खानापूर तालुक्यातील दोघांचा, मिरज ग्रामीण भागातील चौघांचा मृत्यू झाला. पलूस तालुक्यातील एकाचा,  शिराळा तालुक्यातील चार जणांचा आणि  वाळवा तालुक्यातील तब्बल सात जणांचे उपचार सुरू असताना मृत्यू झाले आहेत. जिल्हÎातील एकूण 32 जणांचा रविवारी मृत्यू झाला आहे. आजअखेर 1102 जणांचे मृत्यू झाले आहेत.

परजिल्हÎातील तिघांचा मृत्यू

 परजिल्हÎातील उपचार सुरू असणाऱया तिघांचा मृत्यू झाला आहे. बेळगाव जिल्हÎातील दोन व्यक्तीचा कोरोना रूग्णालय येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर ठाणे जिल्हÎातील एकाचा मृत्यू झाला आहे. आजअखेर परजिल्हÎातील 158 जणांचे कोरोनाने बळी गेले आहेत.

957 जणांची कोरोनावर यशस्वी मात

जिल्हÎात रविवारी तब्बल 957 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे जिल्हÎात आजअखेर बरे झालेल्या रूग्णांची संख्या ही 18 हजार 590 झाली आहे. जवळपास 62 टक्के रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. जिल्हÎात मोठÎाप्रमाणात रूग्ण वाढत असतानाच कोरोनामुक्त होणारे रूग्णही वाढत चालल्याने जिल्हÎाला हा मोठा दिलासा मिळत आहे. त्यामध्ये रविवारी वाढलेल्या रूग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांची संख्या मोठÎाप्रमाणात आहे. त्यामुळे हा एक जिल्हÎाला दिलासा मिळाला आहे.

2603 जणांचे स्वॅब तपासले

जिल्हÎात रविवारी दोन हजार 335 जणांचे स्वॅब तपासले आहेत. यामध्ये आरटीपीसी मधील 1115 स्वॅब तपासणी केली तर रॅपीड ऍण्टीजन टेस्टमध्ये एक हजार 1220 जणांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये नवीन 811 रूग्ण आढळून आले आहेत.

कोरोनाची जिल्हÎातील स्थिती

एकूण रूग्ण    29332

बरे झालेले     18590

उपचारात      9640

मयत          1102

Related Stories

लोकमान्यांनी भेट दिलेले `गीतारहस्य’ मिरजेत

Archana Banage

अहिल्या शिक्षण संस्थेची सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद- मंगेश मंत्री

Archana Banage

Sangli; पृथ्वीराज देशमुख, सत्यजीत देशमुख, सदाभाऊ खोत यांची नावे चर्चेत

Abhijeet Khandekar

चोरीच्या नियंत्रणासाठी आळसंद परिसरात गस्त चालू

Archana Banage

हातकंणगले मतदार संघात भाजपला ताकद देणार

Archana Banage

अडीच तोळ्याचे गंठण धुमस्टाईलने लंपास

Archana Banage
error: Content is protected !!