Tarun Bharat

सांगली जिल्ह्यात कोरोना उपाययोजना अंमलबजावणी समाधानकारक

प्रतिनिधी / सांगली

कोविड-19 संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या उपाययोजना राज्यभर सुरू आहेत. सांगली जिल्ह्यात या योजनांची अंमलबजावणी अतिशय समाधानकारक आहे, असे प्रतिपादन वैद्यकिय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड-19 च्या अनुषंगाने सांगली शहर आणि जिल्ह्यातील स्थितीचा आढावा देशमुख यांनी घेतला. यावेळी सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, आयुक्त नितीन कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाधता डॉ. सुधीर नणंदकर, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी यांची उपस्थिती होती.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या काळाची गरज ओळखून जिल्ह्यातील आरोग्य विषयक सुविधा अद्ययावत करण्यात याव्यात, असे सांगून देशमुख म्हणाले, कोरोना व्यतिरीक्त इतर रूग्णांना उपचारात अडचण निर्माण होणार नाही यासाठी खबरदारी घ्यावी. प्रत्येक रूग्णालयाने वैद्यकीय संरक्षक सामग्री रूग्णालयामध्ये उपलब्ध ठेवणे बंधनकारक आहे.

देशमुख म्हणाले, कोविड-19 ही जागतिक आपत्ती असून या विरूध्द सर्वच पातळीवर लढा सुरू आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अगदी सुरूवाती पासूनच नियंत्रणात ठेवण्यात आला आहे. सुरूवातीला जिल्ह्यात पदरेशातून आलेले काही प्रवासी कोरोना पॉझीटीव्ह आढळल्याने तारांबळ उढाली होती. तथापी पालकमंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री डॉ. कदम आणि प्रशासन यांनी तत्परतेने कंटेन्मेंट झोन आणि अन्य उपाययोजना काटेकोरपणे केल्याने प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यात यश आले. परजिल्ह्यातील, परराज्यातील लोक स्वजिल्ह्यात परतल्याने नंतरच्या काळात जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला पण स्थिती नियंत्रणात आहे.

महाराष्ट्रातील कोरोना बाधीतांचा आकडा अन्य राज्याच्या तुलनेत जास्त असला तरी महाराष्ट्राचे परदेशातील एक्सपोजर जास्त आहे. शासनाने अत्यंत काळजीपूर्वक धाडसी निर्णय घेतल्याने महाराष्ट्रातील कोरोना विरूध्दचा लढा तीव्र आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक सामग्री ऑक्सीजन, व्हेंटीलेटर, पीपीई किट, मास्क, सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कोविड-19 चे उपचार मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जिल्ह्यात मृत्यूदर, रूग्णदर कमी आहे. तसेच रूग्ण दुपटीचा दर पंधरावड्याच्या पुढे गेला आहे. या ठिकाणी सर्व आवश्यक वैद्यकीय सामग्री, औषधे, पर्यायी औषधे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. कोमॉर्बीडीटीमुळे रूग्ण दगावतात हे टाळण्यासाठी अशा रूग्णांची माहिती संकलीत करण्यात येत आहे. प्लाझ्मा थेरपीची उपचार अनेक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुरू करण्यात आले आहेत. प्लाझ्मा बँकही सुरू करण्यात येणार आहे. सरकारी रूग्णांलयामध्ये, प्रयोगशाळांमध्ये अनुषांगिक चाचणी मोफत करण्यात येतेच पण खाजगी प्रयोगशाळेमधील चाचणीचे दरही निर्धारीत करण्यात आले आहेत, असे सांगून देशमुख म्हणाले, आवश्यकतेनुसार खाजगी रूग्णांलयामधील बेडही उपचारासाठी उपलब्ध करून देण्यात येतील. बैठकीत इन्स्टीट्युशनल क्वारंटाईनमध्ये असलेल्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा, 50 वर्षावरील लोकांची वैद्यकीय तपासणी मोहिम, मास्क, सॅनिटायझर यांची जिल्ह्यातील उपलब्धतता यांचा आढावा घेऊन कोमॉर्बीडीटी असणाऱ्या रूग्णाचे योग्य व्यवस्थापन करावे, असे निर्देश देशमुख यांनी दिले.

Related Stories

भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा राधानगरी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा

Abhijeet Khandekar

पोलीस हॉस्पिटलमधून दोघांना डिस्चार्ज

Patil_p

भिंत अंगावर पडून मेंढपाळ मामा-भाच्याचा मृत्यू

Tousif Mujawar

जिल्ह्य़ातील 4363 शाळा सोमवारपासून सुरू

Abhijeet Khandekar

देशात कोरोनाचा कहर सुरूच

Patil_p

हुपरी तलाठी कलाप्पा शेरखाने लाचलुचपतच्या जाळ्यात

Archana Banage
error: Content is protected !!