Tarun Bharat

सांगली जिल्ह्यात विक्रमी 40 मृत्यू

नवे 1141 रूग्ण, 935 कोरोनामुक्तः मनपा क्षेत्रात 169 वाढलेः ग्रामीण भागात 972 रूग्ण वाढले

प्रतिनिधी / सांगली

जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार सुरूच आहे. जिल्ह्यात मृत्यूचे तांडव वाढतच चालले आहे जिल्ह्यात सोमवारी एकाच दिवशी विक्रमी 40 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात एक हजार 141 रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात 169 तर ग्रामीण भागात तब्बल 972 रूग्ण वाढले आहेत. उपचार सुरू असणारे 935 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या उपचारात 11 हजार 544 रूग्ण आहेत.
महापालिका क्षेत्रात 169 रूग्ण वाढले

महापालिका क्षेत्रात रूग्णसंख्या आता मोठÎाप्रमाणात वाढत चालली आहे. महापालिका क्षेत्रात नवीन 169 रूग्ण वाढले आहेत. सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात दिवसेंदिवस ही रूग्णसंख्या वाढतच चालली आहे. सांगली शहरात 113 तर मिरज शहरात 56 रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात आजअखेर 21 हजार 626 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यातील 74 टक्के रूग्ण बरे झाले आहेत. तर उपचारातील रूग्णसंख्येचा आकडा वाढतच चालला आहे.

ग्रामीण भागात 972 रूग्ण वाढले

ग्रामीण भागात रूग्णसंख्येचा उद्रेक सुरू झाला आहे. जिल्हÎातील प्रत्येक तालुक्यात रूग्णसंख्या वाढतच चालली आहे. रूग्ण आटोक्यात येण्याची कोणतीही चित्र दिसून येत नाही. प्रत्येक तालुक्यात रूग्णसंख्या वाढतच चालली आहे. आटपाडी तालुक्यात 54 तर कडेगाव तालुक्यात 114 रूग्ण वाढले आहेत. खानापूर तालुक्यात 94 तर पलूस तालुक्यात 70 रूग्ण वाढले आहेत. तासगाव तालुक्यात 64 तर जत तालुक्यात 127 रूग्ण आढळून आले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात 69, मिरज तालुक्यात 195 रूग्ण वाढले. शिराळा तालुक्यात 53 तर वाळवा तालुक्यात 132 रूग्ण वाढले आहेत.

विक्रमी 40 जणांचे मृत्यू

जिल्ह्यात सोमवारी विक्रमी 40 जणांचे मृत्यू झाले आहेत. एकाच दिवशी 40 जणांना कोरोनाने प्राण गमावावे लागले आहेत. महापालिका क्षेत्रात तब्बल 11 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली शहरातील 7 आणि मिरज शहरातील तीन आणि कुपवाड शहरातील एकाचा मृत्यू झाला आहे. आटपाडी तालुक्यात तीन तर कडेगाव तालुक्यात एक आणि खानापूर तालुक्यात सहा रूग्णांचा मृत्यू झाला आहे. पलूस तालुक्यात एक तर तासगाव तालुक्यात तीन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. जत तालुक्यात दोन तर कवठेमहांकाळ तालुक्यात दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. मिरज तालुक्यात दोन तर शिराळा तालुक्यात एकाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात वाळवा तालुक्यात आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

तब्बल 935 रूग्णांची कोरोनावर मात

जिल्ह्यात कोरोनाचे उपचार सुरू असणारे 935 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजअखेर जिल्ह्यात 70 हजार 332 रूग्ण कोरोनाबाधित झाले आहेत. तर त्यातील 56 हजार 645 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

नवे रूग्ण 1141
उपचारात 11544
बरे झालेले 56645
एकूण 70332
मृत्यू 2143

सोमवारचे बाधित रूग्ण
तालुका रूग्ण
आटपाडी 54
कडेगाव 114
खानापूर 94
पलूस 70
तासगाव 64
जत 127
कवठेमहांकाळ 69
मिरज 195
शिराळा 53
वाळवा 132
सांगली शहर 113
मिरज शहर 56
एकूण 1141

आजचे लसीकरण 23731
एकूण लसीकरण 530496

Related Stories

सांगली जिल्ह्यात नवे 314, तर कोरोनामुक्त 529

Archana Banage

सांगली : मिरजेत चोरीस गेलेल्या चार मोटारसायकली जप्त

Archana Banage

हिजाब प्रकरणी मुस्लिम नेत्यांची कर्नाटक बंदची हाक

Abhijeet Khandekar

सांगली : जिल्हा परिषद शिक्षक हंकारे सरांची ‘वर्ड मॅचिंग’ गेम राष्ट्रीय पातळीवरील बेस्ट गेम

Archana Banage

पुराणकथांनी पुरुषांना स्त्रियांवर अन्याय करायला शिकवले – डॉ.तारा भवाळकर

Archana Banage

मिरजेत तब्बल बारा फुटांची एकतारी

Archana Banage