Tarun Bharat

सांगली जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन; पालकमंत्र्यांची मोठी घोषणा

Advertisements

प्रतिनिधी / सांगली

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढल्याने जिल्ह्यात आठ दिवसाचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. उद्या ५ मे रोजी मध्यरात्रीपासून हा लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांनी ही आज ही मोठी घोषणा केली. आपल्या सर्वांचा जीव वाचणं महत्वाचा आहे त्यासाठीच लॉकडाऊनची गरज असल्याचं भावनिक आवाहन त्यांनी केलं.

लॉकडाऊन हा एकमेव पर्याय

काल सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या १५६८ वर पोहोचली तर ४० रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला, ही बाब अतिशय गंभीर आहे. परिस्थिती आटोक्यात आणायची असेल, तर लॉकडाऊन हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे प्रशासनाशी चर्चा करून सांगली जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय आम्ही घेत असल्याचे त्यांनी ट्विट केले.

सांगली जिल्हा ऑक्सिजनवर

आपल्याला ऑक्सिजन काठावर मिळतंय, प्रचंड ताकद खर्च करून बाहेरून ऑक्सिजन मिळवावे लागत आहे. औषधांबाबतही प्रश्न निर्माण होत आहेत, म्हणून ही शृंखला मोडण्यासाठी बुधवार दि. ५ मे रोजी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात ८ दिवसांचा कडक लॉकडाऊन लावला जाईल.

जीवनावश्यक वस्तूंपेक्षा जीवन महत्त्वाचे
जीवनावश्यक वस्तूंपेक्षा आपल्या सर्वांचे जीवन महत्त्वाचे आहे, त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांना हा लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती करतो. तुम्हा सगळ्यांच्या मदतीनेच आपल्याला कोरोनावर मात करायची आहे. घरीच रहा, सुरक्षित रहा!

– पालकमंत्री जयंत पाटील

Related Stories

मालगावमध्ये विहिरीत पडून सख्ख्या जावांचा मृत्यू

Abhijeet Shinde

सांगली : राष्ट्रवादीने महागाई विरोधात पंतप्रधान मोदींना गोवऱ्या पाठवत केले आंदोलन

Abhijeet Shinde

दारूचे बिल दिले नसल्याच्या कारणावरून दोघांवर कोयत्याने प्राणघातक हल्ला

Sumit Tambekar

Sangli : पत्नीच्या डोक्यात खोरे घालून खून

Abhijeet Khandekar

कुपवाडमध्ये चोरी; २० हजारांचे इलेक्ट्रिक साहित्य लंपास

Abhijeet Shinde

वारकऱ्यांच्या मदतीला धावले मुख्यमंत्री

Abhijeet Shinde
error: Content is protected !!