Tarun Bharat

सांगली जिल्ह्यात 154 नवे रूग्ण, 224 कोरोनामुक्त

जिल्ह्यात चारजणांचा मृत्यूः मनपा क्षेत्रात 21 रूग्ण वाढलेः ग्रामीण भागात 133 रूग्ण वाढलेः

प्रतिनिधी / सांगली

जिल्हयात मंगळवारी नवीन 154 रूग्ण वाढले, तर 224 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचार सुरू असताना चार जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या उपचारात एक हजार 952 रूग्ण आहेत.

महापालिका क्षेत्रात 21 रूग्ण वाढले

महापालिका क्षेत्रात नवीन 21 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये सांगली शहरात 18 तर मिरज शहरात तीन रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात आजअखेर 15 हजार 955 रूग्ण झाले आहेत. त्यातील 92 टक्के रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

ग्रामीण भागात 133 रूग्ण वाढले

ग्रामीण भागात नवीन 133 रूग्ण वाढले आहेत. ग्रामीण भागातही आता कोरोना आटोक्यात येवू लागला आहे. रूग्णवाढीचा दर आता चांगलाच कमी झाला आहे. मंगळवारी आटपाडी तालुक्यात 16 जत तालुक्यात दहा रूग्ण वाढले. कडेगाव तालुक्यात 19 तर कवठेमहांकाळ तालुक्यात आठ, खानापूर तालुक्यात 18 तर मिरज तालुक्यात दहा नवीन रूग्ण वाढले आहेत. पलूस तालुक्यात 16, शिराळा तालुक्यात आठ, तासगाव तालुक्यात 10 तर वाळवा तालुक्यात 18 रूग्ण वाढले आहेत.

उपचार सुरू असताना चौघांचा मृत्यू

जिल्हात उपचार सुरू असताना चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये सांगली शहरातील एकाचा तर जत तालुक्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. शिराळा तालुक्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. आजअखेर जिल्ह्यात एक हजार 626 जणांचा कोरोनाने बळी गेला आहे.

224 कोरोना मुक्त

जिल्ह्यात मंगळवारी उपचार सुरू असताना 224 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आजअखेर 40 हजार 992 रूग्णांनी कोरोनावर मात केली असल्याने जिल्ह्यातील कोरोनामुक्तीचा दर आता 91 टक्केपर्यंत वाढला आहे.

तीन हजार 561 जणांचे स्वॅब घेतले

जिल्ह्यात मंगळवारी तीन हजार 561 जणांचे स्वॅब तपासण्यात आले आहेत. त्यामध्ये आरटीपीसीमध्ये एक हजार 228 जणांचे स्वॅब तपासण्यात आले आहेत. तर दोन हजार 333 जणांचे रॅपीड ऍण्टीजन टेस्ट करण्यात आल्या आहेत. यामध्ये 154 नवीन रूग्ण वाढले आहेत.

परजिल्ह्यातील चार नवीन रूग्ण वाढले

परजिल्ह्यातील नवीन चार रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दोन, राजस्थान राज्यातील एक आणि सोलापूर जिल्ह्यातील एकाचा समावेश आहे. आजअखेर परजिल्ह्यातील एक हजार 382 रूग्णांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. त्यामध्ये एक हजार 137 रूग्ण बरे झाले आहेत. तर उपचारात 39 रूग्ण आहेत. मंगळवारी उपचार सुरू असताना कर्नाटकामधील एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आजअखेर परजिल्ह्यातील 206 जणांचा मृत्यू झाला आहे.

नवीन 154
उपचारात 1952
बरे झालेले 40992
एकूण 44570
मृत्यू 1626

Related Stories

मिरज कोरोना रुग्णालयातील अतिदक्षता विभागात २० खाटा वाढविल्या

Archana Banage

‘लोकमान्य’च्या इस्लामपूर शाखेस जयंत पाटलांची भेट

Archana Banage

सांगली : जुना कराड पंढरपूर रस्त्याचे अतिक्रमण काढण्यासाठी आमरण उपोषण

Archana Banage

पूर परिस्थितीत महाराष्ट्र-कर्नाटक राज्यात समन्वय राहील – जयंत पाटील

Archana Banage

सांगली : मिरजेत घोरपडीची तस्करी करणारे दोघेजण ताब्यात

Archana Banage

सांगली : त्यांनी लॉकडाऊन काळात लिहिली संपूर्ण ज्ञानेश्वरी

Archana Banage