Tarun Bharat

सांगली जिल्ह्याला दिलासा : पॉझिटिव्हीटी रेट पाचच्या खाली

Advertisements

नवे 693 तर कोरोनामुक्त 1021ः उपचार सुरू असताना 22 जणांचे मृत्यूः मनपा क्षेत्रात 78 वाढले

प्रतिनिधी / सांगली

जिल्ह्यात कोरोनाचा कहर कमी होताना दिसून येत आहे. जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचे नवे 693 रूग्ण आढळून आले तर एक हजार 21 रूग्ण कोरोनामुक्त झाले. उपचार सुरू असताना 22 जणांचा मृत्यू झाला. महापालिका क्षेत्रात 78 रूग्ण वाढले तर ग्रामीण भागात 615 रूग्ण आढळून आले. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट हा पाच टक्केपेक्षा कमी झाला आहे. त्यामुळे जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे. सध्या उपचारात आठ हजार 530 रूग्ण आहेत.

गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यातील कोरोनाचा कहर कमी होताना दिसून येत आहे. सोमवारी जिल्ह्यात 11 हजार 661 जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 693 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. सोमवारी महापालिका क्षेत्रात 78 रूग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये सांगली शहरात 68 तर मिरज शहरात 10 रूग्ण आढळून आले आहेत. महापालिका क्षेत्रात आजअखेर 36 हजार 279 रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले त्यामध्ये 92 टक्के बरे झाले आहेत.

ग्रामीण भागात 615 रूग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये आटपाडी तालुक्यात 68, कडेगाव तालुक्यात 46 तर खानापूर तालुक्यात 70 रूग्ण वाढले.पलूस तालुक्यात 41, तासगाव तालुक्यात 119 तर जत तालुक्यात 65 रूग्ण वाढले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात 25, मिरज तालुक्यात 61 वाढले. शिराळा तालुक्यात 15 तर वाळवा तालुक्यात 105 रूग्ण आढळून आले. उपचार सुरू असताना 22 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये महापालिका क्षेत्रातील पाच जणांचा समावेश आहे. सांगली शहरातील दोन तर मिरज शहरातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. कडेगाव, खानापूर आणि पलूस तालुक्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. तासगाव आणि जत तालुक्यात प्रत्येकी तिघांचा मृत्यू झाला आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात दोघांचा तर मिरज तालुक्यात तिघांचा मृत्यू झाला आहे. शिराळा तालुक्यात एकाचा तर वाळवा तालुक्यात दोघांचा मृत्यू झाला आहे.

उपचार सुरू असणाऱ्या एक हजार 21 रूग्णांनी सोमवारी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे जिल्ह्याचा कोरोना रूग्ण बरे होणाऱयांची संख्या आता वाढली आहे. आजअखेर एक लाख 58 हजार 38 रूग्ण बरे झाले आहेत.

नवे रूग्ण 693
उपचारात 8530
बरे झालेले 158038
एकूण 171099

Related Stories

तमासगीर दत्तोबा तिसंगीकर यांना पठ्ठे बापुराव पुरस्कार

Sumit Tambekar

तासगावात ट्रक सोडण्यासाठी मागितली ३० हजाराची लाच

Abhijeet Shinde

सांगली : कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी आता जनता दलाची हेल्पलाईन

Abhijeet Shinde

सांगलीत हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उद्ध्वस्त, आटपाडी पोलीस निरीक्षक अटकेत

Abhijeet Shinde

सांगली जिल्ह्यात लवकरच `रेसिडयू ‘संशोधन केंद्र

Abhijeet Shinde

मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे यांना सांगलीतून पाठिंबा

Sumit Tambekar
error: Content is protected !!