Tarun Bharat

सांगली तरुण भारत आवृत्ती प्रमुख मंगेश मंत्री यांना दमसाचा विशेष पुरस्कार

प्रतिनिधी / कोल्हापूर

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेने लेखकांना दिल्या जाणाऱया 2019 मधील ग्रंथ पुरस्कारांची शनिवारी दुपारी घोषणा केली. यामध्ये तरुण भारतच्या सांगली आवृत्तीचे प्रमुख व सोलापूर तरुण भारत आवृत्तीचे संपादक मंगेश मंत्री यांनी लिहिलेल्या ‘त्यांचे जिणे’ या संकीर्ण साहित्य प्रकारात मोडणाऱया ग्रंथास ‘विशेष पुरस्कार’ जाहीर केला. याचबरोबर वासंती मेरु, डॉ. अरुण शिंदे, डॉ .सुप्रिया आवारे, चंद्रशेखर कांबळे आदींच्या साहित्यकृतींचीही विविध पुरस्कारांसाठी निवड केली. सध्याचा कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित आल्यानंतर समारंभ पूर्वक पुरस्कारांचे वितरण होईल, असे दमसाचे कार्याध्यक्ष प्रा. वि. द. कदम आणि सहकार्यवाह डॉ. विनोद कांबळे यांनी सांगितले.

पुरस्कार प्राप्त पुस्तके व लेखकांची नावे अशी, कंसात पुस्तकांची नावे ः
विशेष पुरस्कार-(त्यांचे जिणे)-तरुण भारतच्या सांगली आवृत्तीचे प्रमुख व सोलापूर तरुण भारत आवृत्तीचे संपादक मंगेश मंत्री

सखा कलाल पुरस्कार (फास)-बाळासाहेब पाटील.
अनुराधा गुरव पुरस्कार- (अरुणोदय)-स्वाती शिंदे पवार.
सूर्य गोंदला भाळी- जगजित महावंश.
कोणत्याही शक्यतेच्या पलिकडे- लवकुमार मुळे.
वारणेची लेकरं- विठ्ठल सदामते.
सावज-सुनील देसाई.
गंध सोनचाफी-गौतम कांबळे.
निर्भय-उमेश सूर्यवंशी.
भारतीय संविधान आणि लोक- विश्वास सुतार.
व्यक्तींच्या नावे दिले जाणारे पुरस्कार असे कंसात पुस्तकांची नावे
देवदत्त पाटील पुरस्कार- (मृत्यूस्पर्श)-डॉ. सतीश कुमार पाटील, (कादंबरी).
शंकर खंडू पाटील पुरस्कार- (सत्यवादी)-बजरंग दत्तू (कथासंग्रह).
अण्णा भाऊ साठे पुरस्कार- (उद्ध्वस्त मनाचा गाभारा)-वासंती मेरु (सामाजिक).
कृ. गो. सूर्यवंशी पुरस्कार- (सत्यशोधकीय नियतकालिके)-डॉ. अरुण शिंदे (संकीर्ण).
चैतन्य माने पुरस्कार (प्रथम प्रकाशन)- (न बांधल्या जाणाऱया घरात) -डॉ .सुप्रिया आवारे (कवितासंग्रह).
शैला सायनाकर पुरस्कार- (शेणाला गेलेल्या पोरी)- चंद्रशेखर कांबळे (कवितासंग्रह).
बालवाडःमय पुरस्कार- (बार्बी डॉल)- वर्षा चौगुले.
दमसाने पुरस्कारासाठी परीक्षक म्हणून निवडलेल्या कादंबरीकार नामदेव माळी, समीक्षक डॉ. जी. पी. माळी, कवी गोविंद पाटील, दयासागर बन्ने यांनी राज्यभरातील लेखकांनी पुरस्कारांसाठी पाठविलेल्या कादंबरी, कथासंग्रह, कविता संग्रह, बालवाडःमय, सामाजिक व संकीर्ण आदी साहित्यकृतींचे परिक्षण केले आहे.

Related Stories

राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित

datta jadhav

कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा अर्ज दाखल

Abhijeet Khandekar

जांभळी आत्महत्या प्रकरण : आत्महत्या की घातपात त्यादृष्टीने तपास सुरू

Archana Banage

Kamal Hasan : चोल काळात हिंदू धर्म नव्हता : कमल हसन यांचा वेत्रीमारन यांना पाठिंबा

Abhijeet Khandekar

हायमास्ट पथदिव्यांसाठी विजपुरवठा करा, अन्यथा उपोषण : जि.प.सदस्या मनिषा कुरणे

Archana Banage

प्रतापगडावरील अफझलखानाच्या थडग्याभोवतीचे अतिक्रमण हटवावे

Patil_p