वार्ताहर / बोरगाव
वाळवा तालुक्यातील ताकारी येथील ३८ वर्षीय पुरुषाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे ताकारी परिसरात घबराटीचे वातावरण तयार झाले आहे ती व्यक्ती राहते तो परिसर कंटेन्मेंट झोन करण्यात आला आहे.
या व्यक्तीचे ताकारी येथे किराणा दुकान आहे ही व्यक्ती किराणा माल आणण्यासाठी सांगली मार्केट यार्डात ये-जा करत होती. या व्यक्तीच्या घरातील सात जणांना क्वारंटाईन केले आहे तसेच सदर व्यक्ती पत्नीला सोडण्यासाठी सात दिवसापूर्वी कर्नाटकमध्ये गेली होती.

