वार्ताहर/संख
जत तालूक्यातील तिकोंडी येथे गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यात काशीबाई बसप्पा चौधरी यांचे घर जळून खाक झाले. ही घटना आज, रविवारी सकाळच्या सुमारास घडली. या आगीत अंदाजे पाच ते सात लाखाचे नूकसान झाले मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटना स्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, तिकोंडी गावापासून एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या चौधरी वस्ती येथे काशीबाई चौधरी यांचे कुटुंब राहते. रात्री अचानक काशीबाई यांच्या आईला अर्धांगवायूचा झटका आल्याने कराडला उपचारासाठी नेण्यासाठी तिकोंडी गावात आले होते. परत जाऊन पाहिले असता गॅसचा स्फोट होऊन घर जळून खाक झाले होते. स्फोट इतका भयानक होता की, दोन किमी परिसरात त्याचा आवाज घुमत होता. स्फोटाचा आवाज ऐकून आग विझवण्यासाठी गावातील लोकांनी धाव घेऊन आग विझवली. ह्या घटनेने परिसरातील हळहळ व्यक्त होत आहे. मात्र घटनास्थळी उशीरा पर्यत पंचनामासाठी महसूल विभागाचे अधिकारी कोणीच फिरकले नाही.


previous post
next post