Tarun Bharat

सांगली : तिघांचा मृत्यू, नवे 48 रूग्ण

प्रतिनिधी / सांगली

शनिवारी जिल्हय़ात नवीन 48 रूग्ण वाढले तर दोनजण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण रूग्णसंख्या 950 झाली आहे. तर उपचारातील रूग्णसंख्या 486 आहे. सांगली-मिरज-कुपवाड महापालिका क्षेत्रात मात्र कोरोनाचा कहर सुरू आहे. शनिवारी महापालिका क्षेत्रात 38 रूग्ण वाढले आहेत. तर तिघांचे कोरोनाने बळी गेले आहेत. येळापूर ता. शिराळा आणि ब्राह्मणपुरी-मिरज येथील व्यक्ती तर विश्रामबाग सांगली येथील महिलेचा बळी गेला आहे. त्यामुळे जिल्हय़ातील बळींची संख्या 29 झाली आहे.

सांगली – मिरज-कुपवाड महापालिका क्षेत्रात कहर सुरूच

गेल्या आठ दिवसापासून सांगली महापालिका क्षेत्रात कोरोनाचे मोठय़ासंख्येने रूग्ण वाढत चालले आहेत. शनिवारी एकाचवेळी 38 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये सांगली शहरात 28 रूग्ण वाढले आहेत. कुंटे मळा येथे दोन, कोल्हापूर रोड, पाटील नगर येथे एक, सावली निवारा केंद्र येथे चार, माधवनगर रोड येथे दोन, शिंदे मळा तीन, दत्तनगर येथे एक, सांगलीवाडी येथे एक, वानलेसवाडी येथे एक, गुजरबोळ येथे सहा, चौगुले प्लॉट येथे दोन, रमामातानगर येथे एक, विजयनगर येथे एक, दत्तनगर येथे तीन तर कुपवाड हद्दीत दोन रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये यशवंतनगर येथे एक, व कापसे प्लॉट येथे एक रूग्ण वाढला आहे. मिरज शहरात आठ रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये अंबिकानगर येथे तीन, माजी सैनिक वसाहत येथे एक आणि गणेश तलाव येथे एक असे रूग्ण वाढले आहेत.

कडेगाव, मिरज, पलूस आणि वाळवा तालुक्यात रूग्ण वाढले

कडेगाव तालुक्यातील कडेगाव शहरात तीन आणि भिकवडी खुर्द येथे एक रूग्ण वाढला. मिरज तालुक्यातील बेडग येथे एक रूग्ण वाढला. पलूस तालुक्यातील बांबवडे येथे एक, नागठाणे येथे एक आणि मालवाडी येथे एक असे तीन रूग्ण वाढले. वाळवा तालुक्यात दोन रूग्ण वाढले आहेत. त्य़ामध्ये इस्लामपूर येथे एक आणि ऐतवडे खुर्द येथे एक रूग्ण वाढला आहे. या सर्वांच्यावर मिरजेच्या कोरोना रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.

१८ जणांची प्रकृती चिंताजनक

सध्या उपचारात असणाऱया रूग्णांपैकी 24 रूग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असणाऱयामध्ये खणभाग सांगली येथील 78 वर्षीय व्यक्ती, सांगली येथील 85 वर्षीय महिला, वानलेसवाडी येथील 86 वर्षाची महिला, कलानगर येथील 65 वर्षीय व्यक्ती, काळे प्लॉट येथील 35 वर्षीय व्यक्ती, हरीपूर रोडवरील 43 वर्षीय व्यक्ती, शास्त्री चौक मिरज येथील 55 वर्षीय व्यक्ती, जत येथील 70 वर्षीय महिला, किल्लाभाग मिरज येथील 75 वर्षीय व्यक्ती, सराटी येथील 44 वर्षीय महिला, नेलकरंजी येथील 53 वर्षीय व्यक्ती, जत येथील 32 वर्षीय व्यक्ती, टिंबर एरिया येथील 55 वर्षीय व्यक्ती, मिरज येथील 48 वर्षीय व्यक्ती, पांढरेवाडी ता. आटपाडी येथील 70 वर्षीय व्यक्ती या 15 जणांचा समावेश आहे. तर परजिल्हय़ातील 03 रूग्णांच्यावरही अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

दोन जण कोरोनामुक्त
जिल्हय़ात शनिवारी अवघे दोन जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे उपचारातील रूग्णसंख्या आता 486 इतकी झाली आहे.

जिल्हय़ातील तिघांचा मृत्यू

कोरोनाचा उपचार सुरू असताना तिघांचे शनिवारी मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये शिराळा तालुक्यातील येळापुर येथील 38 वर्षीय व्यक्ती, मिरज शहरातील ब्राह्मणपुरी येथील 87 वर्षीय व्यक्ती आणि सांगली शहरातील विश्रामबाग येथील 36 वर्षीय महिलेचा कोरोनाने बळी गेला आहे. या तिघांच्यावर मिरजेच्या कोरोना रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्हय़ात कोरोनाने आतापर्यंत 29 जणांचे बळी गेले आहेत.

कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती
एकूण रूग्ण 950
बरे झालेले 435
उपचारात 486
मयत 29

Related Stories

आम्ही खोके घेत असताना तुम्ही नामर्द होता का?; ‘५० खोके, एकदम ओके’च्या घोषणा देणाऱ्या विरोधकांना बच्चू कडूंचा सवाल

Archana Banage

मिरज शासकीय रूग्णालयातील बाह्य व आंतर रूग्ण विभाग ‘या’ तारखेला होणार सुरू

Archana Banage

ही तिसऱ्या लाटेची सुरुवात असू शकते – मंत्री आदित्य ठाकरे

Abhijeet Khandekar

बागणीतील मंडळांचा गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय

Archana Banage

केंद्र सरकारच्या सर्व विभागांमध्ये आजपासून ई-ऑफिस प्रणाली लागू; केंद्रीय राज्यमंत्र्यांची माहिती

Abhijeet Khandekar

दोन उपशिक्षणाधिकाऱयांना पदोन्नती

Patil_p