Tarun Bharat

सांगली : त्रिपुरा घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू; पोलिसांकडून संचलन

Advertisements

सांगली : प्रतिनिधी

त्रिपुरा येथे घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने रझा अकादमीने पुकारलेल्या बंद दरम्यान घडलेल्या घटनेचे पडसाद उमटून महाराष्ट्रात अमरावती, नांदेड, मालेगाव, पुसद व कारंजा या ठिकाणी जातीय हिंसाचार झालेला आहे. यापूर्वीची पार्श्वभूमी पाहता सांगली जिल्ह्यामध्ये या घटनेचा फायदा घेवून काही समाज कंटक दोन समाजामध्ये, गटांमध्ये तेड निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी 20 नोव्हेंबर अखेर जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. या आदेशानुसार पाच व पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येणे, सभा घेणे, तसेच शस्त्र, लाठी, काठी बाळगण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या वतीने सांगली शहरातील प्रमुख मार्गावरून संचलन करण्यात आले.

Related Stories

विहापूर येथे किरकोळ कारणावरुन झालेल्या मारहाणीत दोघांचा खून

Archana Banage

रस्त्याच्या कारणावरून तरुणाला कुऱ्हाडीने मारहाण

Archana Banage

सांगली : मिरजेत शिवजयंतीची मिरवणूक काढल्याने दोन मंडळांवर गुन्हा

Archana Banage

लखलख दिव्यांनी उजळून गेला कृष्णा घाट परिसर

Archana Banage

अचानक पेट घेतल्याने बुलेट आगीच्या भक्क्षस्थानी

Abhijeet Khandekar

भिलवडी गावच्या सरपंचपदी विद्या पाटील यांची बिनविरोध

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!