प्रतिनिधी / भिलवडी
धनगाव ता.पलूस गावात पंचावन्न वर्षाच्या पुरुषास कारोनाची लागण झाली आहे. यामुळे सलग पाच दिवस लॉकडाऊन पाळण्यात येणार असल्याचा निर्णय स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात आला.
सदर सांगली महानगर पालिकेत सेवेत आहे. आजारी असल्यामुळे पाच ऑगस्ट पासून सांगली येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी रात्री त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आज पलूसचे तहसीलदार राजेंद्र पोळ, आरोग्याधिकारी डॉ.रागिणी पवार, मंडला आधिकारी ए.डी.लोहार, ग्रामसेवक प्रकाश माळी,तलाठी शंकर लाड,उपसरपंच राजेंद्र साळुंखे,माजी सरपंच सुवर्णा पाटील, दीपक भोसले, सतपाल साळुंखे, विकास साळुंखे, शशिकांत यादव, रघुनंदन यादव, चंद्रकांत यादव, आदींनी समक्ष भेट दिली. रुग्णाच्या घराचा परिसर कंटेन्मेंट झोन बनविला आहे. आशा वर्कर्स नी परिसरातील कुटूंबियांचा सर्वे केला आहे. सदर परिसर औषध फवारनी करण्यात आली आहे.


previous post
next post