Tarun Bharat

सांगली : नवे ९९ रूग्ण तर १७६ कोरोनामुक्त

उपचार सुरू असताना पाच जणांचा मृत्यूः मनपा क्षेत्रात 29 वाढले
ग्रामीण भागात 70 रूग्ण वाढलेः उपचारात 1690 रूग्ण

प्रतिनिधी / सांगली

जिल्ह्यात कोरोना आता आटोक्यात येवू लागला आहे. प्रथमच सहा महिन्यानंतर रूग्णसंख्या वाढीचा आकडा दोन आकडी आला आहे. जिल्ह्यात नवीन 99 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये महापालिका क्षेत्रात 29 रूग्ण वाढले, ग्रामीण भागात 70 रूग्ण वाढले. तर उपचार सुरू असताना पाच जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या उपचारात एक हजार 690 रूग्ण आहेत.

महापालिका क्षेत्रात 29 वाढले

महापालिका क्षेत्रात रूग्णसंख्या आटोक्यात येवू लागली आहे. महापालिका क्षेत्रात रूग्णसंख्या वाढीचा दर आता अत्यंत कमी झाला आहे. रविवारी नवीन 29 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये सांगली शहरात 15 तर मिरज शहरात 14 रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात आजपर्यंत 16 हजार 48 रूग्ण झाले आहेत. तर 92 टक्के रूग्ण  बरे झाले आहेत.

जिल्ह्यात 70 रूग्ण वाढले
जिल्ह्यात ही रूग्णसंख्या आटोक्यात येवू लागली आहे. रविवारी ग्रामीण भागात 99 रूग्ण वाढले आहेत. रविवारी तालुकानिहाय वाढलेले रूग्णसंख्याही घटली आहे. आटपाडी तालुक्यात सहा,  जत तालुक्यात तीन, कडेगाव तालुक्यात चार रूग्ण वाढले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात चार, खानापूर तालुक्यात 11 रूग्ण वाढले आहेत. मिरज तालुक्यात चार, पलूस तालुक्यात तीन तर शिराळा तालुक्यात आठ रूग्ण वाढले आहेत. तासगाव तालुक्यात 16 तर वाळवा तालुक्यात 11 रूग्ण वाढले आहेत. ग्रामीण भागात रूग्णवाढीचा दरही अत्यंत कमी झाला आहे.

पाच जणांचा मृत्यू
जिल्ह्यात उपचार सुरू असताना पाच रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सांगली शहरातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. खानापूर तालुक्यातील एकाचा  तर मिरज तालुक्यातील एकाचा आणि शिराळा तालुक्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. आजअखेर जिल्हÎातील एक हजार 644 रूग्णांचा बळी गेला आहे.

176 जण कोरोनामुक्त
जिल्ह्यात रविवारी 176 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या अनेक दिवसापासून रूग्णसंख्या वाढीपेक्षा कोरोनामुक्त होणाऱया रूग्णांची संख्या वाढली आहे. आजअखेर 41 हजार 930 रूग्ण बरे झाले आहेत. सध्या उपचारात एक हजार 610 रूग्ण आहेत.

दोन हजार 475 स्वॅब तपासले
जिल्ह्यात रविवारी दोन हजार 475 स्वॅब तपासण्यात आले आहेत. त्यामध्ये एक हजार 149 आरटीपीसी स्वॅब तपासण्यात आले आहेत. एक हजार 326 रॅपीड ऍण्टीजन स्वॅब तपासण्यात आले आहेत. यामध्ये 99 रूग्ण वाढले आहेत.

परजिल्ह्यातील चार रूग्ण वाढले
परजिल्ह्यात रूग्णांच्यावर जिल्ह्यात उपचार करण्यात येत आहेत. रविवारी नवीन चार रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये कोल्हापूरचे तीन आणि दिल्लीचा एक रूग्ण वाढला. आजअखेर एक हजार 400 रूग्ण झाले आहेत. त्यातील एक हजार 157 रूग्ण बरे झाले आहेत. तर 37 रूग्ण उपचारात आहेत. तर आजअखेर परजिल्हÎातील 206 रूग्णांचा बळी गेला आहे.

नवीन रूग्ण   99
उपचारात   1610
बरे झालेले  41930
एकूण     45184
मयत       1644

Related Stories

कोरोनाने लोक मरताना आपत्ती व्यवस्थापन समिती सचिव वाढदिवसात मग्न

Archana Banage

जत तालुक्यातील उटगीत विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

Archana Banage

Sangli : सांगलीत युवकाची विहिरीत उडी; शोध मोहीम सुरू

Abhijeet Khandekar

सांगली : शिराळा तालुक्यात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज

Archana Banage

तासगावात इलेक्ट्रिकल दुकानाला भीषण आग

Archana Banage

समडोळीतील स्वाभिमानी कोव्हीड सेंटर मानवतावादी : राजू शेट्टी

Archana Banage