Tarun Bharat

सांगली : नागठाणे येथे पुरग्रस्त शेतकरी तरुणाची आत्महत्या

वार्ताहर / वाळवा

नागठाणे ता. पलुस येथील पुरग्रस्त शेतकरी तरुण निलेश बाळकृष्ण पवार (वय २२) यांने शेतातील जनावरांच्या गोट्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. गेल्या आठवड्यात आलेल्या महापुरात शेतीचे मोठे नुकसान व जनावरांच्या गोठ्याच्या वरून पाणी गेले आहे. महापुराचे पाण्यामध्ये त्याचे शेतजमीनीतील ऊस पिकाचेही नुकसान झाले आहे. निलेशच्या नावावर थोडेफार कर्जही आहे.

या सगळ्या नैराश्यातुन सकाळी गोट्यातील साफसफाईसाठी गेलेल्या निलेशने पुरामुळे झालेली दुरावस्था पाहुन गणेशनगर येथे जनावरांच्या पत्र्याच्या शेडमध्ये आत्महत्या केली. याबाबत वडील बाळकृष्ण दशरथ पवार रा. नागठाणे यांनी पोलीस ठाणेस फिर्याद दिली आहे.

Related Stories

जलशक्ती अभियानाच्या यशस्वीतेसाठी विशेष ग्रामसभा घ्या- जिल्हाधिकारी

Abhijeet Khandekar

देवराष्ट्रे ग्रामपंचायतवरील कारवाईचा प्रस्ताव फेटाळला

Archana Banage

गरिब, उद्योजकांना तातडीने मदत करा : पृथ्वीराज चव्हाण

Archana Banage

राखी ऐवजी बांधले शिवबंधन!

Archana Banage

सभापतीपदी धीरज सूर्यवंशी निश्चित

Archana Banage

सांगली : आघाडी एकसंघ, भाजप गॅसवर!

Archana Banage