Tarun Bharat

सांगली : नाट्यपरिषदेचे पुरस्कार जाहीर

प्रतिनिधी / सांगली

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद शाखा सांगलीच्यावतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा काकासाहेब खाडिलकर जीवनगौरव पुरस्कार नाट्यदिग्दर्शक बाबासाहेब गणपतराव पाटील, प्राध्यापक दिलीप परदेशी नाट्यरंग पुरस्कार पुरस्कार मिरजेचे नाट्यसंहिता लेखक राम कुलकर्णी, अरुण पाटील नाट्यतंत्र पुरस्कार नाट्य दिग्दर्शिका चेतना वैद्य, नाना ताडे नाट्य स्वर पुरस्कार ज्येष्ठ गायिका श्रीमती मंगला जोशी, आचार्य अत्रे प्रतिभा रंग पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार चिंतामणी सहस्रबुद्धे यांच्यासह नाट्य चित्रपट तंत्रज्ञ कल्याण ट्रस्ट या संस्थेला विशेष सन्मान पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

कोरोनाच्या संकटामुळे पुरस्कार प्राप्त मान्यवरांना घरी जाऊन सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती नाट्य परिषद सांगली शाखेचे प्रमुख कार्यवाह सनित कुलकर्णी यांनी दिली.

Related Stories

सिंधुदुर्गचा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी सांगली – कोल्हापूरहून ५०० कर्मचारी

Archana Banage

सांगली एसटी विभागातील ८८ बसेस इतर डेपोत रवाना

Archana Banage

Sangli; रेल्वे क्रॉसिंगचे प्रलंबित प्रस्ताव तातडीने मंजूर करणार : केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव

Abhijeet Khandekar

सांगली जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन; पालकमंत्र्यांची मोठी घोषणा

Archana Banage

अल्पसंख्याक समाज विकासकामांचे प्रस्ताव तातडीने सादर करा – जिल्हाधिकारी

Archana Banage

नेर्ले येथे वाळूचा ट्रक पलटी, चालक जखमी

Archana Banage