Tarun Bharat

सांगली : नुकसानीचे आत्तापर्यंत 39 हजार 695 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पुर्ण

प्रतिनिधी / सांगली

जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे सांगली जिल्ह्यात शेतीचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. जिल्हयात महापूरामुळे बाधित झालेल्या 5 तालुक्यांतील 247 गावांमधील आतापर्यंत 1 लाख 565 शेतकऱ्यांच्या 39 हजार 695 हेक्टर जमीनींचे पंचनामे पुर्ण झाली आहेत. उर्वरित शेतीचे पंचनामे युध्दपातळीवर पुर्ण करण्यासाठी यंत्रणा गतीने कार्यरत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले आहे.

जिल्ह्यात महापुरामुळे तसेच अतिवृष्टीमुळे, ओढ्यांना जादा पाणी आल्याने मिरज, वाळवा, पलूस, तासगाव व शिराळा या पाच तालुक्यातील 247 गावे बाधित झाले आहेत. शासन निर्देशानुसार बाधित गावातील नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे युद्धपातळीवर करण्यात येत आहेत. यामध्ये मिरज तालुक्यातील 26 गावे बाधित झाली असून तेथील 22 हजार 703 शेतकऱ्याचे 12 हजार 672 हेक्टरचे प्रत्यक्ष पंचनामे पुर्ण झाली आहेत.

वाळवा तालुक्यातील 98 गावे बाधित झाली असून तेथील 43 हजार 2 शेतकऱ्याचे 14 हजार 313 हेक्टरचे प्रत्यक्ष पंचनामे पुर्ण झाली आहेत. शिराळा तालुक्यातील 95 गावे बाधित झाली असून तेथील 21 हजार 246 शेतकऱ्याचे 4 हजार 758 हेक्टरचे प्रत्यक्ष पंचनामे पुर्ण झाली आहेत. पलूस तालुक्यातील 26 गावे बाधित झाली असून तेथील 13 हजार 541 शेतकऱ्याचे 7 हजार 918 हेक्टरचे प्रत्यक्ष पंचनामे पुर्ण झाली आहेत. तासगाव तालुक्यातील 2 गावे बाधित झाली असून तेथील 73 शेतकऱ्याचे 31.92 हेक्टरचे प्रत्यक्ष पंचनामे पुर्ण झाली आहेत.
अतिवृष्टी व पुरस्थितीमुळे 4 तालुक्यातील 113 गावे बाधित झाली असून 67 हजार 681 कुटंबांचे पंचनामे झाली आहेत. पंचनामे झाल्यानूसार पुर्णत: नष्ट झालेली कच्ची घरे 398 व पक्की घरे 135 तर अंशत: नष्ट झालेली कच्ची घरे 3417 व पक्की घरे 1499 आहेत. 19 झोपड्या व 1741 गोठ्यांचेही नुकसान झाले आहे. आज अखेर 121 लहान मोठी जनावरे व 43 हजार 945 कुकुटपक्षांचे पंचनामे झाले आहेत. तसेच आज अखेर 472 हस्तकला, हातमाग, बाराबुलतेदार, 12 हजार 938 दुकानदार, 2 हजार 613 टपरीधारक आणि 29 कुकूटपालन शेड इत्यादींचे पंचनामेनुसार नुकसान दिसुन येत आहे. अशीही माहिती जिल्हाधिकारी चौधरी यांनी दिली .

Related Stories

सांगलीत कोरोनाचा 10 वा बळी, नवे चार रुग्ण

Archana Banage

आ. मानसिंगराव नाईक व विराज नाईक कोरोना पॉजिटीव्ह

Abhijeet Khandekar

Sangli; पावसाचा जोर ओसरला,आयर्विनची पातळी 23 फुटावर

Abhijeet Khandekar

सांगली : फिडे मास्टर शाहीन सादेह ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता

Archana Banage

सातारा : जिल्ह्यात मृत्यूचे तांडव : सोमवारी सर्वोच्च 41 बळी

Archana Banage

सांगली : सत्ता हस्तगत करण्यात यश मिळवले, मात्र भ्रष्टाचार करू देणार नाही

Archana Banage