Tarun Bharat

सांगली : पेठमधील तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

Advertisements

प्रतिनिधी / इस्लामपूर

वाळवा तालुक्यातील पेठ (भीमनगर) येथील विशाल राजेंद्र कुरणे(२९) या तरुणाचा पिण्याच्या पाण्याच्या नळाला विद्युत पंप जोडत असताना विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली.

पेठ येथे प्रादेशिक गाव पाणीपुरवठा योजनेतून पिण्याचा पाणीपुरवठा होतो. काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने सिंगल फेज विद्युत पंप जोडून बहुतांशी ग्रामस्थ पाणी भरतात. शनिवारी पाणी आल्यावर विशाल हा विद्युत पंप जोडण्यास गेला.आजूबाजूचे सर्वजण पाणी भरण्याच्या गडबडीत होते.

दरम्यान विशाल यास विजेचा धक्का बसून तो बेशुद्ध झाला.काही लोकांनी आरडाओरडा केला.त्यावेळी शेजारीच रहाणाऱ्या चुलत भाऊ सुरेश दिलीप कुरणे(३७) यांनी धाव घेतली.त्यांनी त्याला तात्काळ इस्लामपूर येथे उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवले. पण त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला. याप्रकरणी सुरेश यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात वर्दी दिली.

Related Stories

केस घाला, पण ड्रेनेजचं पाणी मनपा अधिकाऱ्यांच्या तोंडवर ओतणार

Abhijeet Shinde

आशा व गटप्रवर्तक कर्मचार्‍यांच्या संप प्रकरणी बोलणी पुन्हा फिसकटली, संप सुरूच

Abhijeet Shinde

सांगलीतील आणखी 46 एसटी कर्मचार्‍यांना कोरोना बाधा

Abhijeet Shinde

सांगली जिल्ह्यात कोरोनाचे ८११ नवे रुग्ण, ३२ जणांचा मृत्यू

Abhijeet Shinde

सांगली : एलईडी दिव्यांनी उजळणार महापालिका क्षेत्र

Abhijeet Shinde

पत्रकारांमध्ये समाजाचा चेहरा बदलण्याची ताकद : बापूसाहेब पुजारी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!