Tarun Bharat

सांगली : प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करा निवडणूक; आयोगाच्या प्रशासनाला सूचना

विटा / प्रतिनिधी

राज्यातील यापूर्वी मुदत समाप्त झालेल्या व डिसेंबर, 2021 ते फेब्रुवारी, 2022 या कालावधीत मुदत समाप्त होणाऱ्या नगरपरिषदांची कच्ची प्रभाग रचना बहुसदस्यीय प्रभाग पध्दती नुसार तयार करुन ठेवण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिल्या आहेत.ही प्रभाग रचना 30 नोव्हेंबर पूर्वी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

राज्यातील नगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली गतिमान झाल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील विटा, इस्लामपूर, आष्टा आणि तासगाव नगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे लक्ष निवडणूक यंत्रणेकडे लागले आहे. आता प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याच्या सूचना आल्याने राजकीय हालचाली गतिमान होणार आहेत. या प्रत्येक नगरपालिकेत किती प्रभाग वाढणार याबाबत उत्सुकता आहे.

राज्य शासनाने सन 2021 चा महारष्ट्र अध्यादेश क्रमांक 10/2021 दि.02 नोव्हेंबर, 2021 रोजी प्राख्यापित केला आहे. यामध्ये “अ” वर्ग नगरपरिषदेसाठी निवडून आलेल्या परिषद सदस्यांच्या संख्येमध्ये 2 ने वाढ केली आहे. तसेच “अ” वर्ग नगरपरिषदेमध्ये किमान सदस्य संख्या 40 असेल आणि 75 पेक्षा अधिक नसेल. “ब” वर्ग नगरपरिषदेसाठी निवडून आलेल्या परिषद सदस्यांच्या संख्येमध्ये 2 ने वाढ केली आहे. “ब” वर्ग नगरपरिषदेसाठी किमान सदस्य संख्या 25 असेल आणि 37 पेक्षा अधिक नसेल. तर “क” वर्ग नगरपरिषदेसाठी निवडून आलेल्या परिषद सदस्यांच्या संख्येमध्ये 3 ने वाढ केली आहे. “क” वर्ग नगरपरिषदेसाठी किमान सदस्य संख्या 20 असेल आणि 25 पेक्षा अधिक नसेल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

शासनाच्या दि. 2 नोव्हेंबर, 2021 च्या अध्यादेशातील तरतुदीनुसार केल्यानुसार सदस्य संख्या निश्चित करुन त्यानुसार कच्ची प्रभाग रचना 30 नोव्हेंबर पूर्वी तयार करुन ठेवावी आणि त्याबाबत आयोगास आवगत करण्यात यावे, असे आयोगाने दिलेल्या आदेशात म्हंटले आहे.

Related Stories

आयपीएल सामन्यावर सट्टा घेणाऱ्या दोघांना अटक

Archana Banage

पुणे-बेंगळूर महामार्गावरील पेठनाक्यावर कारमध्ये आढळला मृतदेह

Archana Banage

कोल्हापूर -पुणे मार्गावर एसटीच्या फेऱ्या वाढल्या

Archana Banage

सांगली : कुटुंब प्रमुखाने घरातील सर्व सदस्यांची आरोग्य तपासणी करून घ्यावी

Archana Banage

आसमा कुरणे करणार 72 किलोमीटर धावण्याचा विक्रम

Archana Banage

सांगली : मिरजेत वाढदिवसाच्या पार्टीत दोन गटात राडा; १२ जणांवर गुन्हा दाखल

Archana Banage
error: Content is protected !!