Tarun Bharat

सांगली : बहे परिसर कृष्णा नदीपात्रात मगरीचे दर्शन

Advertisements

बोरगाव / वार्ताहर

वाळवा तालुक्यातील बहे व खरातवाडी येथे कृष्णा नदी पात्रात जवळपास १० फूट लांबीची मगर निदर्शनास आली असून नदी काठच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कृष्णा नदी पात्रात मगरीचा वावर वाढला आहे.

अशी चर्चा परिसरातील गावात सुरू असतानाच आज अचानक कृष्णा नदी पात्रात बहे पुलाजवळ व खरातवाडी नदीपात्रात मगरीचे दर्शन झाले आहे. ही मगर जवळपास १० फूट लांबीची स्थानिक लोकांच्या निदर्शनास आली असून. सर्वत्र मोबाईलवर त्याचे व्हिडिओ पसरताना दिसत आहेत. बहे ग्रामपंचायतीच्यावतीने वनविभागाला पाचारण केले आहे. मगर पाहण्यासाठी परिसरातील लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली असून नदीकाठच्या लोकांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Stories

सांगली : आळसंदमध्ये आज एकाच दिवशी तिघांचा मृत्यू

Abhijeet Shinde

सांगली : मुलींनी शारीरिक आरोग्याबाबत जागरूक राहणे गरजेचे : डॉ. पाटील

Abhijeet Shinde

निर्धारित किमतीपेक्षा जास्त दराने विक्री केल्यास कारवाई; ..तर ‘या’ नंबरवर करा कॉल

Abhijeet Shinde

ट्रकच्या धडकेत निवृत्त उपअभियंता जागीच ठार

Abhijeet Shinde

सांगली : शांतिनिकेतन अभ्यास केंद्राच्या दोन विद्यार्थीनी महाराष्ट्रात द्वितीय

Abhijeet Shinde

कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम थेट बांधावर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!