Tarun Bharat

सांगली : बागणीत सापडला दुर्मिळ हेलिकॉप्टर मासा

Advertisements

वार्ताहर / बागणी

येथील वारणा नदीमध्ये दुर्मिळ असणारा सकर हा मासा पारंपरिक मासेमारीचा व्यवसाय करणारे आकाश आपटे व सागर आपटे या बंधूना सापडला असून त्याला पाहण्यासाठी युवकांची गर्दी झाली होती.

मासेमारी व्यवसायात प्रसिद्ध असणारे व वारणा फिश सेंटरचे मालक सागर व आकाश आपटे या बंधूंना वारणा नदीमध्ये मासेमारी करत असताना सकर हा दुर्मिळ मासा सापडला असून त्याला त्यांनी मस्यविभाग किंवा फिश ट्यांकमध्ये वापरण्यास देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी आपटे बंधू म्हणाले, हा मासा पाण्याबाहेर ४ ते ५ तास जिवंत राहू शकतो. या माशापासून इतर माशांना धोका असतो. यामुळे जाळ्यांचे देखील मोठे नुकसान होते. याला हेलिकॉप्टर मासा म्हणून देखील ओळखले जाते. सध्या मांगुर मासा देखील वारणा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात आढळत आहे. तो देखील धोकादायक व खाण्यास योग्य नसलेला मासा आहे. सकर माशाचे मूळस्थान अमेरिकेत आहे. फिश ट्यांकसाठी या माशाची मोठ्या प्रमाणात आयात केली जाते. या माशाची वाढ देखील जलद होते. हा मासा खूप टणक असल्यामुळे इतर माशांपासून सुरक्षित असतो. आता हा वारणा नदीमध्ये देखील सापडला असल्याने अजून मोठ्या प्रमाणात याची संख्या असल्याची चर्चा होत आहे. या माशामुळे भविष्यात मासेमारी व्यवसायिकांवर संकट ओढवणार आहे हे मात्र नक्की असे ते यावेळी म्हणाले.

Related Stories

सांगली : सराफ व्यावसायिकाची फसवणूक, दोघांना अटक

Archana Banage

सांगलीत बेकायदेशीर सावकारी करणारा जेरबंद

Abhijeet Khandekar

राजू शेट्टींच्या जलसमाधी यात्रेची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

Archana Banage

रत्नागिरी : कोकण मार्गावर धावताहेत ९ रेल्वेगाड्या

Archana Banage

जमीन वादातून खूनप्रकरणी एकास जन्मठेप

Archana Banage

मिरजेचा जनावर बाजार उद्या पासून सुरू होणार

Archana Banage
error: Content is protected !!