Tarun Bharat

सांगली : बामणोलीतील ‘त्या’ रुग्णाच्या आई आणि मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह

प्रतिनिधी / कुपवाड

बामणोली गावात कोरोना संकट आणखी गडद बनले आहे. एका पाठोपाठ आणखी दोघांचे कोरोना तपासणी अहवाल मंगळवारी पॉझिटीव्ह आल्याने ग्रामस्थात भीतीचे वातावरण पसरले आहे.

दोन दिवसांपूर्वी गावातीलच एका ४५ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याचे उघड़कीस आले होते. आता या रुग्णाशी संबंधित रुग्णाची ७२ वर्षीय आई व ३२ वर्षीय मुलगा या दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यांच्या संपर्कात आलेल्या एकूण २८ जणांचे स्वॅब कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. सर्वांचे अहवाल मंगळवारी प्राप्त झाले असून यामध्ये २६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

बामनोलीतील कोरोनाबाधित ४५ वर्षीय पुरुषाला काही दिवसांपूर्वी छातीत दुखण्याचा त्रास सुरु झाल्याने डॉक्टरांनी त्याचा स्वॅब घेतला होता. त्याचा अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आल्याने उपचारासाठी मिरजेतील कोविड रुग्णालयात दाखल केले होते.

बामणोलीत कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती आढळल्याची माहिती मिळाल्याने कवलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बामणोलीत त्या व्यक्तीच्या संपर्कातील २८ जणांना संस्था क्वॉरंटाईन करून त्याचे स्वॅब कोरोना चाचणीसाठी पाठविले होते. मंगळवारी दुपारी २८ जणांचे कोरोना अहवाल प्राप्त झाले असून यामध्ये कोरोनाबाधित रुग्णाची ७२ वर्षीय आई व ३२ वर्षीय मुलगा अशा दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मिरजेतील कोविड रुग्णालयात दाखल केले. दक्षता म्हणून बामनोलीचे सरपंच राजेश सन्नोळी, उपसरपंच प्रकाश घुटूकडे, माजी उपसरपंच अंकुश चव्हाण, माजी सरपंच सावळाराम शिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित परिसर सील करण्यात आला.

Related Stories

वाई शहरातील बाधित महिलेचा मृत्यू

Patil_p

शिवसेना सातारा पालिकेची निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार

Patil_p

कोल्हापूर : सर्वसामान्य रूग्णांवर उपचार कोण करणार?

Archana Banage

सांगली जिल्ह्यातील युवा सेनाचा शिंदे गटासोबत जाण्याचा निर्धार

Archana Banage

राष्ट्रीय श्रेयांक आराखडा सादर

datta jadhav

सावे येथील अशोकराव माने इन्स्टिटयूट चे ऑनलाईन क्लासेस

Archana Banage
error: Content is protected !!