Tarun Bharat

सांगली : बेडगेत डंपरच्या धडकेत महिला जागीच ठार

Advertisements

संतप्त जमावाकडून डंपरवर दगडफेक

प्रतिनिधी / मिरज

मिरज तालुक्यातील बेडग येथे मुरूम वाहतूक करणाऱ्या डंपरची पाठीमागून धडक बसल्याने मुक्ताबाई नामदेव जाधव (वय ५५) ही महिला जागीच ठार झाली. बेडग गावच्या हद्दीत मिरज-बेडग रस्त्यावर जिल्हा परिषद शाळेच्या समोर सोमवारी दुपारी हा अपघात झाला. अपघातानंतर संतप्त जमावाने डंपरवर दगडफेक केली. रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी मुरूम वाहतूक करणारे डंपर रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवल्या जात असल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला. मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून गुन्हा दाखल केला आहे.

मुक्ताबाई जाधव या त्यांचा मुलगा सुधाकर जाधव याच्या सोबत कोरोनाची लस घेण्यासाठी बेडग येथील जिल्हा परिषद शाळेत आल्या होत्या. लस घेतल्यानंतर मोटार सायकल (एम. एच. १० सी एल २२३१) वरून घरी जात असताना जिल्हा परिषद शाळेसमोर थांबल्या. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेला डंपर (एम. एच. १० सी आर ६५९४) ने धडक दिली. या अपघातात मुक्ताबाई जाधव या जागीच ठार झाल्या. अपघातानंतर संतप्त जमावाने डंपरची हवा सोडून काचांवर दगडफेक केली. रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी आलेले डंपर रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून पळवले जात असल्याचा आरोप यावेळी जमावाने केला. ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Related Stories

नागासोबत खेळाचे व्हीडीओ सोशल मीडियावर प्रदर्शन करणाऱ्या तरुणावर गुन्हा

Sumit Tambekar

पावसाच्या उघडीपमुळे कृष्णेला संथगतीने उतार

Abhijeet Shinde

विरळीच्या त्या आत्महत्याग्रस्त नाभिक कुटुंबाला भाजपा संवेदना सोशल फाउंडेशनचा मदतीचा हात

Abhijeet Shinde

सांगली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा ;तहसीलदारांना निवेदन

Abhijeet Shinde

सांगली महापालिकेस रुग्णवाहिका आणि शववाहिका प्रदान

Abhijeet Shinde

हाथरस प्रकरणी सांगलीत भाकपची निदर्शने

Abhijeet Shinde
error: Content is protected !!