मृत जत तालुक्यातील, रात्रीच्या सुमारास कॅनॉलमध्ये पडल्याची शक्यता
प्रतिनिधी/मिरज
मिरज तालुक्यातील बेळंकी येथील म्हैसाळ जलसिंचन योजनेच्या कॅनॉलमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह दुचाकीसह आढळून आला. नागाप्पा निंगाप्पा कोळी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. रात्रीच्या सुमारास अपघात होऊन सदर मोटारसायकलस्वार मोटारीसह कॅनॉलमध्ये पडला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
दरम्यान, सदर मृत व्यक्तीजवळ एक पिशवी सापडली असून, त्यामध्ये बँक पासबुक आणि आधार कार्ड मिळाले. त्यावरुन सदरचा व्यक्ती हा जत तालुक्यातील एकुंडी गावातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिस त्याच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत.

