Tarun Bharat

सांगली : ‘भारती’मध्ये ऑक्सिजन निर्मिती प्लँट : डॉ. विश्वजीत कदम

प्रतिनिधी / सांगली

भारती हॉस्पिटलमध्ये महिन्यात साडेचार कोटी रुपये खर्चून ऑक्सिजन निर्मिती प्लँट उभा करणार आहे. येथे मिनिटाला 500 लिटर ऑक्सिजन निर्मिती होणार आहे. असे तीन प्लँट असतील, यामुळे भारती हॉस्पिटलला वर्षभराचा कोटा उपलब्ध होणार आहे. तर अतिरिक्त ऑक्सिजन जिल्ह्यातील इतर दवाखान्यांना देण्यात येणार असल्याची माहिती, राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी पत्रकार बैठकीत दिली.

मंत्री डॉ. कदम म्हणाले, जिल्ह्यात ऑक्सिजनअभावी रुग्ण व नातेवाईकांची तारांबळ उडत आहे. त्यामुळे भारती हॉस्पिटलने सांगली आणि पुणे येथे ऑक्सिजन निर्मिती प्लान्ट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे येथील प्लँटची निर्मिती सुरू झाली आहे. सांगलीतील आता सुरू होणार आहे. या प्लँटमधून मिनिटाला 500 लिटर ऑक्सिजन मिळेल. साठ्यासाठी मोठ्या टाक्याही बांधणार आहोत. भारती हॉस्पिटलसाठीचा सर्व ऑक्सिजन येथे प्राप्त होईल. उर्वरित अतिरिक्त साठी जिल्ह्यातील इतर दवाखान्यांना देणार आहोत. आगामी काळात ऑक्सिजनसाठी इतर जिल्ह्यावर अवलंबून राहावे लागणार नाही.

जिल्ह्याला आता 43 टनाचा ऑक्सिजनचा कोटा प्राप्त झाला आहे. त्यानुसार पुणे येथून एका कंपनीतून दररोज हा ऑक्सिजन मिळणार असल्याने ऑक्सिजन योग्य प्रमाणात उपलब्ध राहिल, असेही त्यांनी सांगितले. भारती हॉस्पिटलचे प्रमुख एच. एम. कदम, डीन डॉ. देशमुख उपस्थित होते.

Related Stories

मुचंडी येथे शेततळ्यात पडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

Archana Banage

संख येथे ग्राम न्यायालय : आमदारांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

Abhijeet Khandekar

सांगली : कोणतीच रेल्वे कायमस्वरूपी रद्द नाही, अफवा पसरविणाऱ्यांवर होणार कारवाई

Archana Banage

सांगली : पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले शेकडो हात

Archana Banage

यापुढे ठोशास ठोशानेच उत्तर देणार

Archana Banage

रेल्वेच्या चौपदरी उड्डाणपुलासाठी ७६ लाखांचा निधी वर्ग

Archana Banage