Tarun Bharat

सांगली : भिलवडी येथे तेरा दिवसाच्या चिमूरड्याचा खून

प्रतिनिधी / भिलवडी


भिलवडी ( ता. पलूस ) येथील माळवाडी जवळील पाटील रोड मळा येथील तेरा दिवसाच्या चिमूरड्याचा पाण्याच्या टाकीत टाकून निर्दयीपणे खून करण्यात आला.

अधिक माहिती आशी पाटील रोड मळा येथील उत्तम माळी यांच्या मुलीला तेरा दिवसाचा मूलगा होता. तेरा दिवसाच्या चिमूरड्याची आई प्रात:विधीसाठी सकाळी गेली असता अज्ञाताने चिमूरडयास इमारतीच्या दुसऱ्या मजल्याच्या टेरीस वरील पाण्याच्या टाकीत निर्दयपणे टाकले. चिमूरड्याच्या आईने बाळ आचानक गायब झाल्याने शोधा शोध केली.

परंतु बाळ सापडेना घरातील नातेवाईकांनी बाळाची शोधाशोध करीत टेरसवरील पाण्याच्या टाकीत पाहीले असता बाळाचा मृतदेह आढळून आला. घटना ठिकाणी भिलवडी पोलिसांनी भेट देऊन घटना ठिकाणचा पंचनामा करून बाळाची आई व घरातील सर्व नातेवाईकांचा जबाब घेतला असून या घटनेचा आधिक तपास भिलवडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक कैलास कोडग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक विशाल जगताप करीत आहे. या घटनेने भिलवडी माळवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Related Stories

सांगली : वाघमोडेनगरच्या विस्तारीत भागात मुबलक पाणी मिळणार : गजानन मगदुम

Archana Banage

आरग येथे जेसीबीच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडले

Archana Banage

Sangli : लाखोंची द्राक्षबाग वटवाघुळांनी केली एका रात्रीत फस्त

Abhijeet Khandekar

सांगली : नेत्रदान चळवळीसाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे येणे गरजेचे : जिल्हा शल्य चिकित्सक

Archana Banage

सावळीत फोटोग्राफरची लुटमार, १ लाख ३४ हजारांचे साहित्य चोरले

Archana Banage

खाडे, दानवेंनी शेतकऱ्यांची माफी मागावी

Archana Banage