Tarun Bharat

सांगली : मनपा क्षेत्रात सहा नवे रूग्ण ,तर जिल्ह्यात 222 कोरोनामुक्त

ग्रामीण भागात 130 रूग्ण वाढलेः उपचार सुरू असताना चार जणांचा मृत्यूः उपचारात 1520 रूग्ण

प्रतिनिधी / सांगली

महापालिका क्षेत्रात अवघे सहा नवीन रूग्ण वाढले आहेत. त्यामुळे महापालिका क्षेत्रात कोरोना आटोक्यात येवू लागला आहे. दरम्यान ग्रामीण भागात मात्र नवीन 130 रूग्ण वाढले आहेत. जिल्ह्यात उपचार सुरू असताना 222 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचारात एक हजार 520 रूग्ण आहेत.

महापालिका क्षेत्रात फक्त सहा रूग्ण वाढले

महापालिका क्षेत्रात कोरोना आता आटोक्यात येवू लागला आहे. महापालिका क्षेत्रात सोमवारी अवघे सहा रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये सांगली शहरात एक तर मिरज शहरात पाच रूग्ण वाढले आहेत. आजअखेर महापालिका क्षेत्रात 16 हजार 54 रूग्ण झाले आहेत. त्यामध्ये 93 टक्के रूग्ण बरे झाले आहेत.

ग्रामीण भागात 130 रूग्ण वाढले

ग्रामीण भागात मात्र रूग्ण वाढतच आहेत. सोमवारी ग्रामीण भागात 130 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये आटपाडी तालुक्यात दोन रूग्ण वाढले. जत तालुक्यात 13 रूग्ण वाढले आहेत. कडेगाव तालुक्यात 22, कवठेमहांकाळ तालुक्यात 18, खानापूर तालुक्यात दहा रूग्ण वाढले. मिरज तालुक्यात आठ, पलूस तालुक्यातदोन तर शिराळा तालुक्यात 11 रूग्ण वाढले आहेत. तासगाव तालुक्यात 30 तर वाळवा तालुक्यात 14 रूग्ण वाढले आहेत. ग्रामीण भागात मात्र अद्यापही कोरोना आटोक्यात आला नाही.

उपचार सुरू असताना चार जणांचा मृत्यू

जिल्ह्यात उपचार सुरू असताना चार रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये तासगाव तालुक्यातील तीन रूग्णांचा तर शिराळा तालुक्यातील एका रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर जिल्हयात एक हजार 648 रूग्णांचा बळी गेला आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर मात्र देशांच्या मृत्यूदरापेक्षा अधिक आहे.

परजिल्ह्यातील दोन रूग्ण वाढले

परजिल्ह्यातील रूग्णांच्यावर जिल्ह्यात उपचार करण्यात येतात सोमवारी परजिल्ह्यातील दोन रूग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये एक कोल्हापूर जिल्ह्यातील तर दुसरा सातारा जिल्ह्यातील आहे. आजअखेर एक हजार 402 रूग्णांच्यावर उपचार करण्यात आले. त्यामधील एक हजार 161 रूग्ण बरे झाले आहेत. तर उपचारात 33 रूग्ण आहेत. उपचार सुरू असताना 208 रूग्णांचा बळी गेला आहे.

दोन हजार 446 स्वॅब तपासण्यात आले

जिल्ह्यात उपचार सुरू असताना दोन हजार 446 जणांचे स्वॅब तपासण्यात आले आहेत. त्यामध्ये 571 जणांचे आरटीपीसी स्वॅब तपासले तर एक हजार 875 रूग्णांची रॅपीड ऍण्टीजन तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 130 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

222 जण कोरोनामुक्त

जिल्ह्यात उपचार सुरू असताना सोमवारी 222 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजअखेर 42 हजार 152 रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. जिल्ह्यात रूग्ण बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. जिल्ह्यात जवळपास 93 टक्के रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या उपचारात एक हजार 520 रूग्ण आहेत.

नवीन रूग्ण 136
उपचारात 1520
बरे झालेले 42152
एकूण 45320
मृत्यू 1648

Related Stories

सांगली : निवडणुकीत लाखोने उधळणारे राजकीय नेते बाकीच्या भानगडीत व्यस्त

Archana Banage

सांगली : मिरजेत पूर्ववैमनस्यातून तरुणावर केला धारदार चाकूने खुनी हल्ला

Archana Banage

सांगली :`त्या’एमडी डॉक्टराचा जामीन फेटाळला

Archana Banage

सांगली जिल्ह्यात नवे ११५० रूग्ण, ३३ मृत्यू

Archana Banage

मुख्यमंत्री ठाकरे उद्या पंतप्रधान मोदींना भेटणार

Archana Banage

मिरजेत चाकूहल्ला करुन डॉक्टरला लुबाडले

Archana Banage