Tarun Bharat

सांगली : मनपा शाळेतील सेवानिवृत्त शिक्षकांचे पेन्शनविना हाल; दोन महिने थांबलेली पेन्शन तात्काळ द्या

प्रतिनिधी / कुपवाड

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या शाळेतील सर्वच सेवानिवृत्त वयोवृद्ध शिक्षकांची पेन्शन गेल्या दोन महिन्यापासून थांबल्याने पेन्शनविना शिक्षकांचे प्रचंड हाल सुरु आहेत. शासनाने याचा गांभीर्याने विचार करून दोन महिन्यापासून थांबलेली पेन्शन तात्काळ द्यावी, अशी आग्रही मागणी शिक्षकांनी केली आहे.

याबाबतचे लेखी निवेदन शिक्षक संघटनेने शासनाकडे दिले आहे. निवेदनात म्हटले की, सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेच्या शाळेतील सर्व सेवानिवृत्त वयोवृद्ध शिक्षकांची माहे मार्च महिन्याची मनपा हिश्याची ५० टक्के पेन्शन जमा झाली आहे. परंतु, गेल्या दोन महिन्याची शासन हिश्याची पेन्शन अद्याप मिळाली नाही. यामुळे अनेक सेवानिवृत्त वयोवृद्ध शिक्षकांचे दवाखाना,औषध पाणी, घरखर्च अन्य बाबींमुळे आर्थिक हाल होत आहे. सध्याच्या कोरोनाच्या काळात उधारी, उसनवारी याबाबतही सर्व पर्याय खुंटले आहेत. त्यामुळे शासनाने सदर बाबीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून वयोवृद्ध शिक्षकांचे होणारे हाल थांबवण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी आणि शिक्षकांची पेन्शन तात्काळ जमा करण्यात यावी, अशी मागणी सर्व वयोवृद्ध सेवानिवृत्त शिक्षक- शिक्षिकांच्यावतीने होत आहे.

Related Stories

सांगली जिल्ह्यात कोरोनाचे नवे 16 रुग्ण तर 31 कोरोनामुक्त

Archana Banage

शिराळा तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण

Archana Banage

सांगली : भाजप पश्चिम महाराष्ट्र संघटन प्रमुखपदी मकरंद देशपांडे

Archana Banage

केवायसीच्या नावाखाली शेतकऱ्याची ७४ हजारांची फसवणूक

Abhijeet Khandekar

सांगली : किर्लोस्कर कंपनीच्या व्यवस्थापकास मारहाण

Archana Banage

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आमदार सुधीर गाडगीळ यांची विचारपूस

Archana Banage