Tarun Bharat

सांगली : महिन्यात पाच लाखांवर नागरिकांचे लसीकरण करणार

सांगली / प्रतिनिधी

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या नियमांचे पालन आणि लसीकरण हे प्रभावी साधन आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सतरा हजारावर लोकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस पूर्ण झाले आहेत. तर एक लाखाहून अधिक नागरिकांना पहिला डोस देण्यात आला आहे. आतापर्यंत शहरी आणि ग्रामीण भागात 111 ठिकाणी लसीकरण सुरू होते. उद्यापासून नव्याने 116 उपकेंद्रांमध्ये लसीकरण देण्यात येणार आहे. 45 वर्षांवरील पाच लाख वीस हजार नागरिकांना आगामी एक महिन्यात कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.

जिल्हाधिकारी म्हणाले, कोरोनाचा सामना करण्यासाठी लसीकरण अत्यावश्यक बाब आहे. या लसीचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. त्याच बरोबर लस घेतल्यानंतर कोरोना होण्याची शक्यताही कमी आहे. पण जर कोरोना झालाच तर त्याची तीव्रता अत्यंत कमी होते. त्याचबरोबर रुग्णाची गुंतागुंतही कमी होते. त्यामुळे नागरिकांनी कोणतेही गैरसमज न पाहता मोठ्या प्रमाणावर लसीकरण करून घ्यावे. यासाठी सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी ही जनजागृती करावी असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. उद्यापासून जिल्ह्यात दोनशे सत्तावीस ठिकाणी दररोज लसीकरणाची सुविधा सुरू करण्यात आली आहे. असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

Related Stories

कोरोना रूग्णांसाठी शंभर बेडची सोय करू – अण्णा डांगे

Archana Banage

सांगली : उद्योजक संघटनांनी कोविड सेंटर्स उभारण्यावर भर द्यावा – जिल्हाधिकारी

Archana Banage

सांगली : सिंगल फेज, बंद ट्रान्सफार्मरने शेतीचे नुकसान, महावितरणच्या कारभारावर शेतकऱ्यांतुन संताप

Archana Banage

सांगली : मुलगी झाली म्हणून विवाहितेचा छळ

Archana Banage

‘जयहिंद’च्या सचिव, लिपिकाला तालुका उपनिबंधकांचा दणका

Archana Banage

सांगली : मिरजेत अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

Archana Banage