Tarun Bharat

सांगली : माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार पाहणार खांजोडवाडीची डाळिंब

आटपाडी / प्रतिनिधी

देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे शुक्रवार दिनांक 13 नोव्हेंबर रोजी आटपाडी तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. प्रतिकूल स्थितीत अनेक प्रयोग करत निर्यातक्षम डाळींबाचे भरघोस उत्पादन घेणाऱ्या खांजोडवाडी या गावाला भेट देऊन खासदार शरद पवार शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

दुष्काळ, तेल्या बिब्या चे आक्रमण यासह अनेक संकटाशी मुकाबला करत आटपाडी तालुक्याने डाळिंबामध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे. काही वर्षांपूर्वी टेंभूचे पाणी आल्यामुळे दिलासा मिळाला आहे. परंतु चालू वर्षी कोरोना , लॉक डाऊन आणि अतिवृष्टी यामुळे शेती- शेतकरी उध्वस्त झाला आहे. अशा कठीण प्रसंगात ही आटपाडी तालुक्यातील खांजोडवाडी या गावाने डाळींबाचे भरघोस उत्पादन घेतले आहे. एकिकडे द्राक्ष आणि डाळिंब उध्वस्त झाल्याचे चित्र असताना खांंजोडवाडी ने केलेल्या डाळिंब प्रगतीचे कौतुक म्हणून शुक्रवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार दुपारी दोन वाजता डाळिंब बागांच्या पाहणीसाठी येत आहेत .खांजोडवाडी चे सरपंच रामदास सूर्यवंशी, प्रगतशील शेतकरी प्रकाशबुवा सूर्यवंशी, प्रताप्राव काटे, रमेश सूर्यवंशी, अनिल सूर्यवंशी यांनी बारामती येथे भेट घेतली असता खासदार शरद पवार यांनी आटपाडी तालुक्यातील खांजोडवाडी गावाच्या भेटीचा दौरा निश्चित केला.

Related Stories

सांगली : ‘त्या’ धडकेतील जखमीचा मृत्यू, दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल

Archana Banage

Sangli; ऑगस्ट उजाडला तरी कोयनेत 65 टीएमसी पाणीसाठा

Abhijeet Khandekar

सोरडी जि. प. शाळेच्या छताचे प्लॅस्टर कोसळले , एक विद्यार्थी किरकोळ जखमी

Archana Banage

कोल्हापूर, सांगलीचा पुराचा धोका टाळण्यासाठी फडणवीस, चंद्रकांत पाटील प्रयत्नशील: केशव उपाध्ये

Archana Banage

वीजदर कपातीची घोषणा फसवी : ६.७ टक्के दरवाढ होणार

Archana Banage

सांगली : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात अतिरिक्त निर्बंध लागू

Abhijeet Khandekar