Tarun Bharat

सांगली मार्केट यार्डात ११० कोटींची उलाढाल ठप्प!

हळद, गूळ, बेदाण्यासह शेतीमालाचे सौदे बंद ः कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे 19 दिवस यार्ड बंद

प्रतिनिधी/सांगली

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्या त कडक लॉकडाऊन सुरू आहे. याची अंमलबजावणी येथील मार्केट यार्डात केली जात असून तब्बल 19 दिवस यार्ड बंद आहे. यामुळे यार्डातील सर्व व्यवहार, सौदे बंद असल्याने आतापर्यंत सुमारे 100 कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. दरम्यान, बंदमुळे यार्डात शुकशुकाट पसरला असून हमाल, गाडीवानांसह यावर अवलंबून असणाऱया घटकांची मोठी गोची झाली आहे.

कोरोना साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने कडक लॉकडाऊन केला आहे. वसंतदादा पाटील मार्केट यार्डामध्येही अंमलबजावणी सुरु असल्याने 19 दिवसापासून येथील सौदे बंद आहेत. यामुळे आतापर्यंत शंभर कोटीवर रकमेची उलाढाल ठप्प झाली आहे. यार्डात दिवसाला चार ते पाच कोटींची उलाढाल होत असते.

लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात बाजार समितीने 6 ते 12 मे पर्यंत सौदे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. यामुळे पहिल्या टप्प्यात सुमारे 25 ते 30 कोटींची उलाढाल थांबली. त्यानंतर दुसऱया टप्प्यात पाच दिवस यार्ड बंद राहिल्याने 20 कोटींची उलाढाल थांबली. मध्यंतरी होलसेल किराणा दुकाने 18 ते 22 मे पर्यंत सुरू ठेवली मात्र इतर शेतीमालाचे सौदे बंदच होते. यात दहा ते पंधरा कोटींची उलाढाल थांबली. 22 मेपासून पुन्हा यार्ड बंद असून सुमारे 30 कोटींची उलाढाल थांबली आहे. बंदमुळे 19 दिवसांत सुमारे 100 कोटींची उलाढाल ठप्प झाल्याचे सांगण्यात आले. 1 जूनपर्यंत यार्डातील सर्व व्यवहार बंदच राहणार असून आणखी 20 ते 25 कोटींची उलाढाल थांबणार असल्याचे सांगण्यात आले.

बंदमुळे यार्डात शुकशुकाट पसरला आहे. शेतीमालाच्या गाडÎांमुळे यार्डात दिवसभर गर्दी असायची, हमाल, शेतकरी, अडत्या, खरेदीदार, याशिवाय किराणा माल घेण्यासाठी येणाऱयांची मोठी वर्दळ होत असते मात्र बंदमुळे शुकशुकाट पसरली आहे. प्रवेशद्वारही बंद आहेत. कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून शेतकरी, हमाल, व्यापारी, अडत्या यासह सर्वच घटकाला मोठा फटका सहन करावा लागला आहे. बाजार समितीचेही कोटÎवधीचे नुकसान झाले आहे. मात्र कोरोना साखळी तोडण्यासाठी यार्ड बंद ठेवणे महत्वाचे आहे. सर्व घटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांनी केले आहे.

बेदाणा, हळद, कोटÎवधीचा शेतीमाल पडून

ऐन हंगामातच कोरोनाच्या दुसऱया लाटेमुळे शेतीमालाच्sा सौदे बंद ठेवावे लागले आहेत. यामुळे सध्या कोटÎवधीचा शेतीमाल विक्रीविना पडून आहे. सध्या बेदाणा,  हळदीचा हंगाम आहे, सौदेच बंद असल्याने मालाचा उठाव होत नसून गोदाम आणि कोल्डस्टोअरेजमध्ये माल पडून आहे. परिणामी शेतकऱयांचे मोठे नुकसान होत असून दराही कमी झाले असल्याचे सांगण्यात आले.

Related Stories

प्रभाग १५ मध्ये २५ लाखांच्या रस्ते कामांचा शुभारंभ

Archana Banage

सांगली : रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण धारकांना मुदतवाढ

Archana Banage

राजर्षी शाहू गव्हर्मेंट बँक निवडणुक; सत्तारूढ पॅनल ९ जागांवर आघाडीवर

Archana Banage

सांगली : विट्यासाठी आळसंद तलावात ताकारीचे पाणी सोडा : आमदार अनिल बाबर

Archana Banage

कोरोना पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील यंत्रणांमधील समन्वय उल्लेखनीय – पालकमंत्री जयंत पाटील

Archana Banage

सांगलीत गुळाला 5100 रुपयांचा उच्चांकी भाव

Abhijeet Khandekar