Tarun Bharat

सांगली : मिरजेतील व्यापाऱ्यांचा लॉकडाऊनला विरोध

Advertisements

उद्या प्रांताधिकाऱ्यांना भेटून निवेदन देणार

प्रतिनिधी / मिरज प्रशांत नाईक

सांगली जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने 12 जुलैपर्यंत वाढविलेल्या लॉकडाऊनला मिरज शहरातील व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. सोमवारी सकाळपासून सर्व दुकाने उघडण्याचा निर्णय रविवारी झालेल्या व्यापाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. लॉकडाऊनला विरोध असल्याबाबत सोमवारी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देणार असल्याची माहिती मिरज व्यापारी असोसिएशनने दिली आहे.

सततच्या लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन नको, असा सूर स्थानिक व्यापाऱ्यांनी आळवला आहे. रविवारी सकाळी मिरज व्यापारी असोसिएशनची आदर्श मंगल कार्यालयात बैठक झाली. अध्यक्ष विराज कोकणे, अभय गोगटे, गजेंद्र कल्लोळी, महेश बेडेकर, प्रसाद मदभावीकर, सुनील चिप्पलकट्टी, ओंकार शिखरे, अजीत माने, अश्वीन दावडा, सच्चानंद आहूजा, महादेव फुटाणे, आशोक शहा आणि बंडू कोपार्डे आदींनी लॉकडाऊनबाबत विचारमंथन केले. सोमवारी सकाळी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देऊन सर्व दुकाने उघडणार असल्याचे व्यापारी असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Related Stories

सांगली : धनगावमध्ये एकास कोरोनाची बाधा

Abhijeet Shinde

“सांगली जिल्ह्यातील मराठा मुला-मुलींच्या वसतीगृहाचा प्रश्न शासन सोडवणार”

Abhijeet Shinde

सांगली : जतमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण, अंकलेत एकाला लागण

Abhijeet Shinde

उद्या बागणीत कोविड सेंटरचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Abhijeet Shinde

बागणी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयास आय.एस.ओ. मानांकन जाहीर

Abhijeet Shinde

सांगाव येथील गाडी चोरी प्रकरणी संशयित आरोपीस अटक

Sumit Tambekar
error: Content is protected !!