Tarun Bharat

सांगली : मिरजेत जुगार अड्डयावर छापा, सात जणांना अटक

स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई, 28 हजारांचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी / मिरज

मिरज शहरातील स्टँड परिसरात एका बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर सुरू असलेल्या तीनपानी जुगार अड्डयावर बुधवारी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून 7 जणांना अटक केली. या जुगाऱ्यांकडून 28 हजार, पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये जुगार अड्डा चालक अस्लम निजामुद्दीन शेख (वय 32, रा. मंगळवार पेठ), असलम महंमद चाबुकस्वार (वय 25, रा. सौदागर गल्ली), जावेद बशीर मकानदार (वय 23, रा. भाऊराव चौक), ख्रिजार आयुब पठाण (वय 25, रा. वेताळनगर, मेंढे कॉलनी), इर्शाद रफिक शेख( वय 27, रा. मोमीन गल्ली), मुदस्सर झाकीर निकडे (वय 25, रा. गुरुवार पेठ, निकडे गल्ली) आणि मोहसीन निसार कुरुंदवाडे (वय 30, रा. ख्वाजा वसाहत झोपडपट्टी) यांचा समावेश आहे.

मिरज ग्रामीण एसटी स्थानका शेजारी अक्षय हॉटेलजवळ कादरी हॉस्पिटलच्या समोरील एका बिल्डिंगमध्ये पहिल्या मजल्यावर अस्लम शेख हा तीनपानी जुगार अड्डा चालवीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस पथकाने तेथे छापा टाकला असता वरील सातजण जुगार खेळत असताना मिळून आले. पोलिसांनी सर्वांना अटक केली. त्यांच्याकडून पत्त्याची पाने आणि रोख रक्कम असा 28 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Related Stories

सांगली : पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तरुणास अटक

Archana Banage

सांगली : सख्या भावाने दगडाने ठेचून केली भावाची हत्या

Archana Banage

दिघंची सरपंच,उपसरपंच पतीसह चार कर्मचारी पॉझिटिव्ह,शहर बनले हॉटस्पॉट

Archana Banage

बेकायदा पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकास अटक

Abhijeet Khandekar

सांगली : कडेगावचे नगरसेवक नितिन शिंदेचा आमरण उपोषणाचा इशारा

Archana Banage

कर्नाटकातून आलेले दोघे मिरजेच्या आयसोलेशन वॉर्डात दाखल

Archana Banage