Tarun Bharat

सांगली : मिरजेत डॉक्टराचा बंगला फोडून चार लाखांचे दागिने लंपास

Advertisements

प्रतिनिधी / मिरज

शहरातील सांगलीकर मळा, श्रीनगरी कानडे कॉलनी येथे राहणाऱ्या डॉ. नितीन विश्वास चिकुर्डेकर (वय ३५) यांचा बंगला फोडून चोरट्यांनी कपाटात ठेवलेले सुमारे चार लाख रुपयांचे दागिने लंपास केले. २ जुलै ते ११ जुलै दरम्यान ही चोरी झाली आहे. याबाबत चिकुर्डेकर यांनी मिरज शहर पोलिसात फिर्याद दिली असून, अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. उच्चभू लोकवस्तीत डॉक्टराचा बंगला फोडून चोरी झाल्याने परिसरात घबराट पसरली आहे.

डॉ. नितीन चिकुर्डेकर यांचा सांगलीकर मळा, श्रीनगर कानडे कॉलनी येथे कविषा रो बंगलो नं. ए ५ बंगला आहे. दोन जुलैपासून ते बाहेर गेले होते. अज्ञात चोरट्यांनी या बंगल्यावर पाळत ठेवून ही चोरी केल्याचा अंदाज आहे. चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश करुन आतील कपाटात ठेवलेले सोन्याच्या बांगड्या, मनगाल मणी, साखळी, लटकन, मंगळसूत्र, कानवेल जोड, कर्णफुले असे सोन्या-चांदीचे सुमारे चार लाख रुपयांचे दागिने लंपास केले.

चिकुर्डेकर हे रविवारी ११ जुलै रोजी घरी आले असता घरात चोरी झाल्याची बाब निदर्शनास आली. त्यांनी याबाबत मिरज शहर पोलिसात फिर्याद दिली असून, अज्ञात चोरट्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, सांगलीकर मळा परिसरात अनेक उच्चभू लोकांचे रो बंगलो आहेत. डॉक्टराचा बंगला फोडून चोरी झाल्याने परिसरात घबराट पसरली आहे. या भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून, पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

Related Stories

मार्केट यार्डात गोळीबार करत 28 लाख लुटले

datta jadhav

सांगली : आघाडी धर्माची बिघाडी काँग्रेसकडूनच झाली

Abhijeet Shinde

सांगली : कुपवाड मुख्य रस्त्यावरील खड्डे महिलांनी मुजवले; मनपा प्रशासन, पदाधिकाऱ्यांचे झोपेचे सोंग

Abhijeet Shinde

शेतकरी आंदोलनाला मिरज शहरात पाठिंबा

Abhijeet Shinde

शरद पवार मोठे नेते, मात्र…; शहाजी बापू पाटलांनी ‘या’ दिग्गज नेत्यांच्या पराभवाची करून दिली आठवण

Abhijeet Shinde

कोल्हापूर : काखे – मांगले पूलाचे काम १५ सप्टेंबरपूर्वी पूर्ण करा – आ. विनय कोरे

Abhijeet Shinde
error: Content is protected !!