Tarun Bharat

सांगली : मिरजेत दोन लाखांचा दारुसाठा जप्त

Advertisements

एकास अटक, अन्य तिघांचा शोध सुरू

प्रतिनिधी / मिरज

मिरज-म्हैसाळ रस्त्यावर विजयनगर गावच्या हद्दीत गोवा बनावटीची अवैध दारु वाहतूक करणारा टाटा सुमो पकडून पोलिसांनी दोन लाख, 12 हजार, 480 रुपयांचा दारुसाठा तसेच वाहतुकीसाठी वापरलेली टाटा सुमो चारचाकी असा सात लाख, 17 हजार, 480 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

रविवारी सकाळी सात वाजता ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी टाटासुमो चालक अजय आबासा शिंदे याला अटक करण्यात आली असून, चारचाकीही जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, सदरची दारु बाळासा पंडीत तांबे (रा. लक्ष्मीनगर, मालगांव) याची असल्याचे स्पष्ट झाले असल्याची माहिती पोलिस उपाधीक्षक अशोक वीरकर यांनी दिली.

Related Stories

सांगली जिल्ह्यात 154 नवे रूग्ण, 224 कोरोनामुक्त

Abhijeet Shinde

कृष्णा नदीची खोली व रुंदी मोजण्यासाठी केंद्रीय जल आयोगाचे पथक रवाना

Abhijeet Shinde

पत्रकारांना दरमहा मानधन आणि विमा संरक्षण द्या – दिनकरराव पतंगे

Abhijeet Shinde

पूर्ववैमनस्यातून तरुणावर खुनी हल्ला; तिघांना अटक

Abhijeet Shinde

अवकाळीच्या दणक्याने तासगाव तालुक्याच्या पूर्व भागातील द्राक्षशेती उध्वस्त

Abhijeet Shinde

वीज पडून मोटारसायकल जळून खाक

Abhijeet Shinde
error: Content is protected !!