ऑनलाईन टीम / मिरज
कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यात आलेल्या विशेष कोविड रुग्णालयातील कोरोना योध्यांनाच आता कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. रविवारी एका परिचारीकेसह वॉर्डबॉय आणि एक चतुर्थश्रेणी कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आढळला. कोविड सेंटरमध्येच कोरोनाने थैमान घातल्याने वैद्यकीय पंढरी पुन्हा एकदा हादरली आहे. रुग्णालयातील 25 हून अधिक कर्मचाऱ्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.
दक्षिण महाराष्ट्रातील हे पहिले कोविड रुग्णालय आहे. सांगली जिह्यासह आसपासच्या जिह्यातील रुग्णांच्या चाचणी आणि उपचाराची सोय याठिकाणी करण्यात येत आहे. सध्या सांगली जिह्यात कोरोनाची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोविड रुग्णालयातील कर्मचारीही अहोरात्र सेवा देत आहेत. आता या कर्मचाऱ्यांनाच कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने रुग्णालयात खळबळ माजली आहे.


previous post