Tarun Bharat

सांगली : मिरज-पंढरपूर रस्त्यावर दरोडेखोरांचा थरार

लाखांचा ऐवज लंपास करून महिलांना घरात कोंडून घातले
चारचाकीही फोडली, चाकूचा धाक दाखवून लुबाडणूक, दरोडेखोर सीसीटीव्हीत कैद

प्रतिनिधी / मिरज

मिरज-पंढरपूर रस्त्यावर तानंग फाटा येथे शनिवारी रात्री 12 च्या सुमारास पाच जणांच्या दरोडेखोरांच्या टोळीने अक्षरश धुमाकूळ घालत रोख रक्कम, दागिने, मोबाईल, धान्य आणि तेलाचे डबे असा लाखभर रुपयांचा ऐवज लंपास केला. इस्सार पेट्रोल पंपाजवळील अजंठा प्रिकास्ट या सिमेंट पाईप कंपनीत काम करणाऱ्या महिलांच्या घरांना बाहेरुन कडी लावून दरोडेखोरांनी थरार माजविला. त्यानंतर रस्त्यावरुन जाणाऱ्या एका चारचाकीवर लोखंडी पार मारुन काचा फोडल्या. सदरचे दरोडेखोर सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. याप्रकरणी पोलिस उपाधीक्षक अशोक वीरकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. श्वान पथक, ठसे तज्ञांना पाचारण करुन दरोडेखोरांचा शोध घेतला जात आहे.

Related Stories

कोरोना लसीकरणासाठी सांगली सज्ज

Archana Banage

सांगलीत हिसडा टोळीकडून सोन्याची साखळी लंपास

Abhijeet Khandekar

कराड-रत्नागिरी महामार्ग २ तासासाठी रोखला

Archana Banage

जिह्यातील रूग्णसंख्येचा आकडा अडीचशे पार

Archana Banage

कोरोनाबाबत अनाठायी भिती आणि बेफिकीरी दोन्हीही धोकादायक डॉ. विश्वनाथ पाटील यांचे मत

Tousif Mujawar

रोझावाडी येथे उसाचा ट्रॅक्टर उलटला, दोन जनावरे दगावली

Archana Banage