Tarun Bharat

सांगली : मिरज रेल्वे जंक्शन परिसरात नशेखोरांचा हैदोस

Advertisements

हत्यारांचा धाक दाखवत चार व्यापाऱ्यांना लुटले, तिघांना अटक

प्रतिनिधी / मिरज

नशेखोर टोळ्यांचा दहशतीमुळे रेडझोन बनत चाललेल्या शहरातील रेल्वे जंक्शन आणि एसटी स्थानक परिसरात नशेबाज तरुणांचा हैदोस सुरूच आहे. मंगळावारी रात्री पाच जणांच्या नशेखोर तरुणांच्या टोळीने चार व्यापाऱ्यांना धारदार हत्यारांचा धाक दाखवून लुबाडले. रात्री साडेनऊ ते दहा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. महात्मा गांधी चौकी पोलिसांनी तिघा नशेखोराना अटक केली आहे. एसटी स्थानक आणि रेल्वे जंक्शन परिसरात पोलिसांच्या नाकावर टिच्चून एक दिवस आड लूटमारीच्या घटना घडत असल्याने पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये रोहन राजाराम यादव (वय १९, रा. नदिवेस), असरूद्दिन नैरुद्दिन अबुफाजल (वय ३२, रा. कोल्हापूर रोड), असिफ उर्फ भाऊ शकील मुल्ला (वय २४, रा. मिरासाहेब दर्ग्याजवळ) या तिघांचा समावेश आहे. तर शोएब नामक तरुणासह आणखी दोघांवर गुन्हा दखल करण्यात आला आहे.

मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास सदर पाच ते सहा नशेखोर तरुण हे गांजा आणि नशेच्या गोळ्यांचे सेवन करून स्टेशन परिसरात हैदोस घालत होते. यावेळी स्टेशन परिसरातील दुकाने सुरू होती. नशेखोरानी एका दुकानात चप्पल, एका दुकानात गॉगल, एका दुकानात घड्याळ आणि एका दुकानात चप्पल घेतली. मात्र, त्याचे पैसे दिले नाहीत. दुकानदारांनी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली असता सदर नशेखोरानी चाकूचा धाक दाखवून खंडणी मागितली. पैसे नाही दिले तर भोसकून टाकेन, अशी धमकी दिली. त्यानंतर अन्य प्रवाशांची लुटमार करण्याच्या हेतूने सदर नशेखोर हे स्टेशन परिसरातच फिरत होते. व्यापाऱ्यांनी याची माहिती पोलिसांनी दिली. महात्मा गांधी चौकी पोलिसांनी तिघांना अटक केली.

Related Stories

रोजगार हमी व ग्रंथालय समितीवर आ. विक्रमसिंह सावंत यांची निवड

Archana Banage

सांगली : पोलिसांच्या धडक कारवाईनंतर मनपा प्रशासनाला जाग

Archana Banage

साळमाळगेवाडीत दूध व्यावसायिक तरुणाचा गळा चिरून खून

Archana Banage

सांगली : विनयभंगप्रकरणी आरोपीला एक वर्षाची कैद

Archana Banage

सांगली : हरिपूरमधील श्री संगमेश्वरची श्रावणी सोमवार यात्रा रद्द

Archana Banage

सांगली : भिलवडीसह दहा गावांमध्ये पूरग्रस्त संतप्त

Archana Banage
error: Content is protected !!