Tarun Bharat

सांगली : मुख्य बाजार पेठेतील १०० अतिक्रमणावर हातोडा

Advertisements

प्रतिनिधी / सांगली

सांगली शहरात अतिक्रमण मोहिम तीव्र करण्यात आली आहे. गेल्या सहा दिवसापासून सुरू असणाऱ्या या मोहिमेत आज मुख्य बाजार पेठेतील अतिक्रमणे हटविण्यात अली. जवळपास १०० हुन अधिक अतिक्रमणे उध्दवस्त करण्यात आली. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार उपायुक्त राहुल रोकडे यांनी ही कारवाई केली.

सांगली शहरात मुख्य बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात रस्त्यावर अतिक्रमणे तसेच वाढीव शेड, छपऱ्या याचबरोबर बेकायदा उभारण्यात आलेले बांधीव कट्टे हे रस्त्यावर उभारल्यामुळे ही अतिक्रमणे हटविण्याच्य सूचना मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिले होते. यानुसार उपायुक्त राहुल रोकडे, सहायक आयुक्त सहदेव कावडे, अतिक्रमण अधिकारी दिलीप घोरपडे यांच्यासह पथकाने 30 संप्टेंबर पासून शहरात अतिक्रमण मोहीम राबवत अतिक्रमणे हटविली आहेत.

सोमवारी सकाळी पथकाने गणपती पेठ, बालाजी चौक, हरभट रोड, जुनी मंडई तसेच बुरुड गल्ली परिसरातील १०० हुन अधिक अतिक्रमण हटविली आहेत. यामध्ये मुख्य मार्गावरील व्यावसायिकांची बेकायदा थाटलेली पत्र्याचे शेड जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात आली तर रस्त्यावर बांधण्यात आलेले कट्टे, पायऱ्या यासुद्धा पथकाने हटविल्या आहेत.

या कारवाईत स्वच्छता निरीक्षक प्रणिल माने, धनंजय कांबळे, वैभव कुदळे, गणेश माळी, अतिक्रमण विभागाचे विक्रम घाडगे यांच्यासह कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता. ही मोहीम सातत्याने सुरु राहणार असून रस्त्यावरचे अतिक्रमांचे लोकांनी स्वताहून काढून घ्यावे अन्यथा महापालिका प्रशासनाकडून ते हटविण्यात येईल असा इशारा उपायुक्त राहुल रोकडे यांनी दिला आहे

Related Stories

सांगली : खटावमधील दारुबंदीसाठी आता विशेष महिला ग्रामसभा

Abhijeet Shinde

महाविकास आघाडीचा मी गुलाम नाही,चुकणार तिथं बोलणार – राजू शेट्टी

Abhijeet Shinde

कुपवाडचा गुन्हेगार सांगली, कोल्हापुर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार

Abhijeet Shinde

सांगली : मिरजेत नागरिकांनी रस्त्याचे काम बंद पाडले

Abhijeet Shinde

खानापुरात सुहास शिंदेंची सत्ता कायम

Abhijeet Shinde

सांगली : परफॉर्मन्स सिक्युरिटी डिपॉझिट न भरणाऱ्यांना काळ्या यादीत टाका – विनायक सिंहासने

Abhijeet Shinde
error: Content is protected !!