Tarun Bharat

सांगली : म्हैसाळ योजनेचे आवर्तन तात्काळ सुरू करा

उपसभापती अनिल आमटवणे यांचे कार्यकारी अभियंत्यांना निवेदन

प्रतिनिधी / मिरज

सध्या मिरज तालुक्याच्या ग्रामीण भागात प्रचंड पाणी टंचाई निर्माण झाली आहे. विहिरी, कुपनलिकांनी तळ ठोकला आहे. शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, म्हैसाळ योजनेचे आवर्तन तात्काळ सुरू करून मिरज तालुक्याला पाणी द्यावे, अशी मागणी मिरज पंचायत समितीचे उपसभापती अनिल आमटवणे यांच्यासह तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी केली आहे.

अनिल आमटवणे यांच्या नेतृत्वाखाली खंडेराव जगताप, वसंतराव गायकवाड, सलगरे सरपंच तानाजी पाटील, एस.आर.पाटील, मालगावचे प्रदीप सावंत,कृष्णदेव कांबळे, अरविंद पाटील, पै. अण्णा खोत, गणेश देसाई यांनी ताकारी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या कार्यकारी अभियंत्यांना मागणीचे निवेदन दिले. 81:19 फॉर्म्युल्या प्रमाणे लाभधारक शेतकरी पाणी बिल भरण्यास तयार असून, पाणी देण्यास दिरंगाई करू नये. अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे.

Related Stories

इस्लामपूर पोलीसांकडून चारचाकी चोरट्यांच्या टोळीचा छडा; चारचाकी हस्तगत

Abhijeet Khandekar

सांगली : कडेपूरातील ऐतिहासिक शिवकालिन विहिरीचे रुपडेच बदलले

Archana Banage

Sangli : मक्याच्या शेतात गांजाची लागवड; ९ लाखाचा गांजा जप्त

Abhijeet Khandekar

पूर प्रवण भागातील नागरिकांनी जनावरे, आवश्यक साहित्यासह त्वरित स्थलांतरीत व्हावे : जयंत पाटील

Archana Banage

संवेदनशील सामाजिक स्थितीत विनोद निर्मिती आव्हानात्मक- अभिनेते योगेश शिरसाट

Archana Banage

को – 265 जातीच्या ऊसाची नोंद न घेतल्यास गाळप परवाना नाही

Archana Banage